'लोकमत-बिर्ला सनलाईफ'द्वारे आज 'इन्व्हेस्टमेंट सूत्र' सेमिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2016 02:59 AM2016-06-25T02:59:03+5:302016-06-25T02:59:03+5:30

'लोकमत व बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड' यांच्या संयुक्त विद्यमाने गुंतवणुकीच्या संधी संदर्भात गुंतवणूकदारांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदार

Today 'Investment Sutra' Seminar by 'Lokmat-Birla Sunlight' | 'लोकमत-बिर्ला सनलाईफ'द्वारे आज 'इन्व्हेस्टमेंट सूत्र' सेमिनार

'लोकमत-बिर्ला सनलाईफ'द्वारे आज 'इन्व्हेस्टमेंट सूत्र' सेमिनार

Next

नागपूर : 'लोकमत व बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड' यांच्या संयुक्त विद्यमाने गुंतवणुकीच्या संधी संदर्भात गुंतवणूकदारांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदार जागृती कार्यशाळेची मालिका शनिवार २५ जून २०१६ रोजी हॉटेल सेंटर पॉइंट, रामदासपेठ येथे ४.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
म्युच्युअल फंड, व्यावसायिक व्यवस्थापन, कमी किंमत, पारदर्शकता, रोकड सुलभता आणि मजबूत नियामक आराखडा या संदर्भातील लाभाची गुंतवणूकदारांना जाणीव होण्याकरिता हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. पद्धतशीर गुंतवणूक योजना, दीर्घकालीन गुंतवणूक, ध्येय आधारित गुंतवणूक, पूर्व प्रारंभ आणि चक्रवाढ व्याजातून मिळणारा लाभ, तरूण वयात उच्च शिक्षणाकरिता गुंतवणूक इत्यादी योजनात गुंतवणूक करीत गुंतवणूकदार अतिरिक्त लाभ मिळवू शकतात. हा एक राष्ट्रीय गुंतवणूकदार शिक्षण व जनजागृती उपक्रम आहे. गुंतवणुकीच्या संधीसंदर्भात जनजागृती वाढविणे हे गुंतवणूकदाराच्या शैक्षणिक भूमिकेचे मूळ उद्दिष्ट आहे. जानाल तरच मानाल हे नागरिकांना वित्तीय गुंतवणूक संदर्भातील निर्णय घेण्यास मार्गदर्शक ठरणार असून त्या संदर्भातील उपलब्ध संधीबाबत त्यांच्यात जागरूकता निर्माण करणार आहे. फक्त नागरिकांचे वित्तीय व पैसाबाबतचे ज्ञान वाढविण्यासंदर्भातील हा उपक्रम नसून तो लोकांच्या दृष्टिकोनासंदर्भात आहे. संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात वित्तीय साक्षरता घडवून आणण्याच्या दिशेने ठेवलेले हे एक पाऊल आहे.
वैयक्तिक वित्तीय साक्षरता व मूलभूत वित्तीय सेवा पुरवून कुटुंबातील आर्थिक स्थिरता आणि दीर्घकालीन वित्तीय सेवा प्रदान करत उत्कृष्ट जीवनमान सुधारणे हे मूलभूत ध्येय आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पूर्व नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ९८८१७४९३९०, ९९२२९१५०३५, ९८२२४०६५६२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे अहवान करण्यात आले आहे. नावनोंदणी करून सर्वांना मोफत प्रवेश दिला जाईल. (प्रतिनिधी)

कार्यक्रमाची नाव नोंदणी
करून सर्वांना मोफत प्रवेश
या कार्यक्रमात मि. प्रशांत गुप्ता, बिर्ला सन लाइफ म्युचवल फंड, रिजनल हेड, मि. गुरुराज एव्हीपी इन्व्हेस्टर एज्युकेशन आॅफ डिस्ट्रिब्युशन डेव्हलपमेंट मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: Today 'Investment Sutra' Seminar by 'Lokmat-Birla Sunlight'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.