आज ‘मत’परीक्षा

By admin | Published: February 21, 2017 01:52 AM2017-02-21T01:52:26+5:302017-02-21T01:52:26+5:30

महापालिका निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

Today 'vote' examination | आज ‘मत’परीक्षा

आज ‘मत’परीक्षा

Next

मनपा प्रशासन सज्ज : उपराजधानीत तगडा पोलीस बंदोबस्त
नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिकेच्या १२ झोनमधील ३८ प्रभागातील २७८३ मतदान केंद्रांवर महापालिकेच्या १५१ जागांसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. ११३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून २० लाख ९३ हजार ३९२ मतदार त्यांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत.
दोन मतदान कें दे्र पहिल्या माळ्यावर
नागपूर शहरातील २७८३ मतदान केंद्रांपैकी दोन मतदान केंद्र पहिल्या माळ्यावर ठेवण्यात आली आहेत. यात उमरेडवरील ताजाबाग माध्यमिक शाळा व उदयनगर येथील सेंट विसेंट हायस्कूलचा समावेश आहे. या मतदान केंद्रावर दिव्यांगासाठी डोलीची व्यवस्था करण्यात आली आहे.

अशी आहे मतदान केंद्रांची रचना
महापालिका निवडणुकीसाठी ९६१ इमारतीत २७८३ मतदान केंद्र राहणार आहेत. यात एका इमारतीत ९ मतदान केंद्र आहेत. १५५ इमारतीत प्रत्येकी एक , ३१२ इमारतीत प्रत्येकी दोन मतदान केंद्र, १९७ इमारतीत प्रत्येकी तीन, १५५ इमारतीत प्रत्येकी चार, ८५ इमारतीत प्रत्येकी पाच, ३९ इमारतीत प्रत्येकी सहा, ११ इमारतीत प्रत्येकी सात तर सहा इमारतीत प्रत्येकी ८ मतदान केंद्र आहेत.

चार रंगांच्या मतपत्रिका
बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत मतदान यंत्रावर चार रंगांच्या मतपत्रिका लावण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागातील ‘अ’ जागेसाठी पांढरा रंग, ‘ब’ जागेसाठी फिक्का गुलाबी, ‘क’ जागेसाठी फिक्का पिवळा आणि ‘ड’ जागेसाठी फिक्का निळा रंग वापरला जाणार आहे. प्रभाग १ ते ३७ मधील मतदारांना प्रत्येकी चार उमेदवारांना तर प्रभाग ३८ मधील मतदारांना प्रत्येकी तीन मतदान करावयाचे आहे. एखाद्या उमेदवाराला मतदान करावयाचे नसल्यास नोटाचा वापर करता येणार आहे.

प्रभागनिहाय मतदार यादी
नागपूर शहरात २० लाख ९३ हजार ३९२ मतदार असून यात १० लाख ७० हजार ९३० पुरुष तर १० लाख २२ हजार ३९९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. नागपूर शहरातील मतदारांची संख्या २०१२ च्या तुलनेत १ लाख ३ हजारांनी वाढलेली आहे.

१६ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती
महापालिका निवडणुकीसाठी १६ हजार ४९५ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात मतदान कें द्राध्यक्ष, मतदान अधिकारी -१ मतदान अधिकारी-२, मतदान अधिकारी-३ व शिपाई आदींचा यात समावेश आहे.

२७९ वाहनांची व्यवस्था
महापालिकेच्या १२ झोनमध्ये २७८३ मतदान केंद्रे आहेत. १६ हजार ४९५ कर्मचारी व अधिकारी या प्रक्रियेत सहभागी आहेत. त्यांची ने-आण करणे, मतदानाचे साहित्य, मतदान केंद्रांवर पोहचवणे यासाठी २७९ वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात राज्य परिवहन महामंडळाच्या ६८ बसेस, शहर परिवहन विभागाच्या १०२ स्टार बसेस व ३४ मिनी बसेस तसेच ७५ जीप वाहनांचा यात समावेश आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी व भरारी पथकासाठी यापूर्वीच वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

उमेदवारांना दोनच वाहने वापरता येणार
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाच्या दिवशी उमेदवाराला स्वत:साठी व मतदान प्रतिनिधीसाठी अशा दोन वाहनांचा वापर करण्याची मुभा राहणार आहे. त्यापेक्षा अधिक वाहनांचा उमेदवारांना वापर करता येणार नाही.


२०० मीटर परिसरात बुथ नाही
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात उमेदवारांना कोणत्याही स्वरूपाचा प्रचार करता येणार नाही. या परिसरात उमेदवारांना प्रतिनिधींचा बुथ उभारता येणार नसल्याची माहिती अपर आयुक्त रवींद्र्र कुंभारे यांनी दिली
 

Web Title: Today 'vote' examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.