शेतकºयांच्या प्रश्नांसाठी आज चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 01:53 AM2017-08-14T01:53:19+5:302017-08-14T01:53:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकºयांच्या प्रश्नांसाठी लढा देणाºया शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने सोमवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. नागपुरातही हे आंदोलन होणार असून ‘प्रहार’ व ‘जय जवान, जय किसान’ या दोन्ही संघटना एकत्र येत आंदोलनाची मशाल हाती घेणार आहे.
सुकाणू समितीचे सदस्य आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत रविवारी नागपुरात ‘जय जवान, जय किसान’च्या कार्यालयात बैठक झाली. तीत ‘जय जवान, जय किसान’चे संयोजक प्रशांत पवार यांच्यासह अविनाश शेरेकर, विजय शिंदे, अरुण वनकर, रमेश कारेमोरे आदी उपस्थित होते. या बैठकीत सोमवारचे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांकडून आंदोलन दडपण्याची शक्यता विचारात घेता आंदोलनाची वेळ व स्थळ जाहीर करणे टाळण्यात आले. या वेळी आ. कडू म्हणाले, राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकºयांची फसवणूक करणार आहे. कर्जमाफी देताना लादलेल्या अटी जाचक व अपमानास्पद आहे. अधिवेशनात आमदारांनी शेतकºयांचे प्रश्न मांडले. शेतकºयांच्या संघटनांनी आंदोलने केली. मराठा मोर्चातही शेतकºयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने शेतकºयांच्या प्रश्नांची दखल घेतलेली नाही. यावर विचार करून सुकाणू समितीने पुन्हा आरपारची लढाई लढण्याची भूमिका घेतली आहे. प्रशांत पवार म्हणाले, शेतकºयांना आॅन लाईन अर्ज करायला लावणे हे फसवे धोरण आहे. शेतकºयांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे.
सेवाग्राम ते गडचिरोली संघर्षयात्रा
प्रहार व जय जवान जय किसान या दोन्ही संघटना एकत्र येत सेवाग्रम ते गडचिरोली संघर्षयात्रा काढणार आहेत. या अंतर्गत प्रत्येक तालुक्यात बैठका घेऊन शेतकºयांमध्ये जनजागृती केली जाईल. या यात्रेचा कार्यक्रम आखण्यासाठी तीन दिवसांनी आढावा बैठक घेतली जाईल, असे बैठकीत ठरले.