आजचा दिवस ‘लोक’मताचा : लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचे मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:22 AM2019-04-11T00:22:10+5:302019-04-11T00:24:46+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघासाठी गुरुवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघातून ३० उमेदवार नशीब आजमावत असून त्यात भाजपाचे नितीन गडकरी, काँग्रेसचे नाना पटोले, बसपाचे मोहम्मद जमाल, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर ऊर्फ सागर डबरासे, ‘बीआरएसपी’चे अ‍ॅड.सुरेश माने हेदेखील रिंगणात आहेत.

Today's Day of 'Loka'matta: The first phase of Lok Sabha elections will be held | आजचा दिवस ‘लोक’मताचा : लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचे मतदान

आजचा दिवस ‘लोक’मताचा : लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचे मतदान

Next
ठळक मुद्देकोण बनणार खासदार ? मतदारांमध्ये उत्सुकता, राजकीय पक्षदेखील तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघासाठी गुरुवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघातून ३० उमेदवार नशीब आजमावत असून त्यात भाजपाचे नितीन गडकरी, काँग्रेसचे नाना पटोले, बसपाचे मोहम्मद जमाल, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर ऊर्फ सागर डबरासे, ‘बीआरएसपी’चे अ‍ॅड.सुरेश माने हेदेखील रिंगणात आहेत. सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून ६ वाजता मतदान पूर्ण होईल. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी मतदार व विशेषत: नवमतदारांमध्ये उत्सुकता असल्याचे चित्र आहे.
निवडणुकांच्या तारखेची घोषणा होण्याअगोदरच नागपूरचे राजकीय वातावरण तापले होते. प्रचारादरम्यान विविध पक्षाच्या नेत्यांनीदेखील नागपुरात उपस्थिती लावून जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांना साद घातली. याशिवाय सर्वच उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मतदानाच्या दिवशीदेखील उमेदवार व राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे.
गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी नागपूर लोकसभा मतदारसंघात २ हजार ६५ मतदान केंद्र आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या आता २१ लाख ६० हजार २३२ इतकी आहे. यात १० लाख ९६ हजार ३२९ इतके पुरुष आहेत. तर १० लाख ६३ हजार ८२८ महिला मतदार आहेत.
रामटेकमध्ये १९ लाख मतदार
रामटेकमध्ये एकूण १६ उमेदवार रिंगणात आहे. यात शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमान, काँग्रेसचे किशोर गजभिये, बसपाचे सुभाष गजभिये, वंचित बहुजन आघाडीच्या किरण पाटणकर-रोडगे यांचादेखील समावेश आहे. येथेदेखील सर्वच उमेदवारांनी जोर लावला होता. रामटेक लोकसभा मतदार संघात आता १९ लाख २१ हजार ४७ इतकी संख्या झाली आहे. यात ९ लाख ९६ हजार ४५६ पुरुष मतदार तर ९ लाख २४ हजार ५६१ महिला मतदार आहेत. मतदारसंघात एकूण २३६४ मतदान केंद्र आहेत.
कार्यकर्त्यांचे नियोजन
दरम्यान, मतदान केंद्रांजवळ विविध राजकीय पक्षांचे ‘बूथ’ राहणार आहेत. या ‘बूथ’वरील व्यवस्था, मतदारांना सहकार्य, इतर पक्षांवर नजर इत्यादींसाठी कार्यकर्त्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

मतदारसंघांवर नजर
नागपूर
उमेदवार : ३०
मतदार : २१,६०,२३२
मतदान केंद्र : २,०६५

रामटेक
उमेदवार : १६
मतदार : १९,२१,०४७
मतदान केंद्र : २,३६४

Web Title: Today's Day of 'Loka'matta: The first phase of Lok Sabha elections will be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.