इंटर्न्स डॉक्टरांच्या संपावर आज निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:57 AM2018-06-16T00:57:05+5:302018-06-16T00:57:18+5:30
विद्यावेतनाच्या वाढीला घेऊन बुधवारपासून पुकारण्यात आलेल्या अनिश्चितकालीन संपाबाबत शनिवारी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना इंटर्न्स डॉक्टरांचे शिष्टमंडळ भेटून चर्चा करणार आहेत. सूत्रानुसार, इंटर्न्स डॉक्टर मंत्र्यांना भेटणार असल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाकडून शुक्रवारी होणारी कारवाई पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूण : विद्यावेतनाच्या वाढीला घेऊन बुधवारपासून पुकारण्यात आलेल्या अनिश्चितकालीन संपाबाबत शनिवारी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना इंटर्न्स डॉक्टरांचे शिष्टमंडळ भेटून चर्चा करणार आहेत. सूत्रानुसार, इंटर्न्स डॉक्टर मंत्र्यांना भेटणार असल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाकडून शुक्रवारी होणारी कारवाई पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.
चाडेचार वर्षांचा एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ३६५ दिवसांची इंटर्नशीप पूर्ण करावी लागते. या वर्षभरात विद्यार्थी वैद्यकीय कौशल्य आत्मसात करतात. यामुळे हे वर्ष त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते. परंतु सलग तीन दिवस होऊनही संपाबाबत तोडगा न निघाल्याने इंटर्न्स डॉक्टर अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, ‘असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स’च्या नावाखाली गेल्या अनेक वर्षांपासून विद्यावेतन वाढीला घेऊन हक्काची लढाई ते लढत आहे. २०१५ साली शासनाने विद्यावेतन सहा हजारवरून वाढवून ११ हजार रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सलग पाठपुरवठा करूनसुद्धा वाढ झाली नाही. या विरोधात हा संप सुरू आहे. शनिवारी १६ जून रोजी या संपाबाबत निर्णय घेण्यासाठी चंद्रपूर येथील कान, नाक व घसातज्ज्ञ डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या मध्यस्थीने इंटर्न्स डॉक्टर संघटनेचे पदाधिकारी वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटणार आहेत. यात सकारात्मक निर्णय झाल्यास संप मिटण्याची शक्यता आहे.