लोकमत सखी मंच ‘सखी सन्मान अवॉर्ड’चे आज वितरण

By Admin | Published: January 12, 2016 02:43 AM2016-01-12T02:43:00+5:302016-01-12T02:43:00+5:30

लोकमत सखी मंच आणि युनिक स्लिम पॉर्इंट अ‍ॅण्ड ब्युटी क्लिनिकच्यावतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सखींचा सन्मान करणारा ‘सखी सन्मान अवॉर्ड’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Today's distribution of Lokmat Sakhi Forum 'Sakhi Samman Award' | लोकमत सखी मंच ‘सखी सन्मान अवॉर्ड’चे आज वितरण

लोकमत सखी मंच ‘सखी सन्मान अवॉर्ड’चे आज वितरण

googlenewsNext

विविध क्षेत्रांतील कार्यरत महिलांचा होणार गौरव : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी राहणार विशेष आकर्षण
नागपूर : लोकमत सखी मंच आणि युनिक स्लिम पॉर्इंट अ‍ॅण्ड ब्युटी क्लिनिकच्यावतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सखींचा सन्मान करणारा ‘सखी सन्मान अवॉर्ड’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा आज, मंगळवार १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. याचे सहप्रायोजक रियल इन्स्टिट्यूट निर्मल उज्वल को-आॅपरेटिव्ह आणि रेखा नॅचरोकेअर सेंटर हे आहे.
महिलांमधील कलागुणांना वाव देत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन प्रोत्साहित करण्याचे कार्य लोकमत सखी मंच निरंतर करीत आले आहे.
याच शृंखलेत लोकमत सखी मंचच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, कला-साहित्य, क्रीडा, साहस, आरोग्य या सात क्षेत्रात कार्यरत महिलांना गेल्या अनेक वर्षांपासून सन्मानितही करीत आहे. या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले असता ४०० पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले. निवड समितीने प्रत्येक क्षेत्रातून चार-चार नावांची निवड केली आहे. निवड समितीमध्ये पद्मश्री डॉ. विकास महात्मे, ज्येष्ठ समाजसेविका डॉ. रुपा कुळकर्णी, जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, व्हीआयएच्या अध्यक्षा वंदना शर्मा, लोकमत समाचारच्या उपवृत्तसंपादक यामिनी रामपल्लीवार यांचा समावेश होता. नेत्रदीपक सोहळ््यामध्ये या पुरस्काराचे वितरण होईल.
विशेष मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाचे आकर्षण वाढविणार आहे. कार्यक्रमाच्या नि:शुल्क पासेस संपल्या आहेत. उपस्थितांनी कार्यक्रमाला १५ मिनिट अगोदर येऊन स्थान ग्रहण करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)

पार्श्वगायक स्वप्नील बांदोडकर सादर करणार गीत
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि पार्श्वगायक स्वप्नील बांदोडकर हे आहेत. याप्रसंगी पार्श्वगायक बांदोडकर हिंदी-मराठी गीत सादर करतील.

Web Title: Today's distribution of Lokmat Sakhi Forum 'Sakhi Samman Award'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.