नागपुरात ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळावा आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:36 AM2019-01-04T00:36:45+5:302019-01-04T00:38:02+5:30
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे ऑरेंज सिटी क्रॉफ मेळावा आणि लोकनृत्य महोत्सवाचे आयोजन ४ ते १३ जानेवारीदरम्यान सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात करण्यात येणार आहे. महोत्सव दुपारी २ ते रात्री ९.३० पर्यंत सुरू राहील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे ऑरेंज सिटी क्रॉफ मेळावा आणि लोकनृत्य महोत्सवाचे आयोजन ४ ते १३ जानेवारीदरम्यान सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात करण्यात येणार आहे. महोत्सव दुपारी २ ते रात्री ९.३० पर्यंत सुरू राहील.
केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवाडकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, यंदा महोत्सवाचे २६ वे वर्ष आहे. उद्घाटन ४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार असून या प्रसंगी महापौर नंदा जिचकार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित आणि आयकर आयुक्त राजीव रानडे उपस्थित राहतील. विविध राज्यातील कारागिरांचे १२५ स्टॉल आणि फूड झोनमध्ये ३० स्टॉल राहणार आहे. महोत्सवात दररोज सायंकाळी ६.३० वाजता विविध राज्यातील आदिवासी कलावंत नृत्य आणि नृत्यनाटिका सादर करतील. केंद्र परिसराची सजावट पारंपरिक लोककलाकारांतर्फे करण्यात येत आहे. लोकांना विविध राज्यातील वस्तू खरेदीची संधी आहे.