‘गुज्जुभाई बन्या दबंग’ चे आज सादरीकरण
By Admin | Published: February 7, 2017 02:20 AM2017-02-07T02:20:38+5:302017-02-07T02:20:38+5:30
नागपूरचे पहिल्या क्रमांकाचे दैनिक लोकमत समाचार व विको लेबॉरेटरीज यांच्या संयुक्त विद्यमाने ..
नागपूर : नागपूरचे पहिल्या क्रमांकाचे दैनिक लोकमत समाचार व विको लेबॉरेटरीज यांच्या संयुक्त विद्यमाने गुजराती हास्य नाटक ‘गुज्जुभाई बन्या दबंग’ चे सादरीकरण मंगळवार, ७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात होणार आहे. या नाटकाचे प्रमुख प्रायोजक कॉन्फिडन्स ग्रुप आहे. या नाटकासाठी गुजराती बांधवांमध्ये कमालीचा उत्साह आहे. आयोजनाचे विशेष आकर्षण गुजराती रंगभूमीचे सुपरस्टार, हास्य किंग म्हणून प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ रांदेरिया राहणार आहे. त्यांना गुजराती नाट्यक्षेत्रातील अमिताभ बच्चन म्हटले जाते. त्यांचे नाटक ‘लगे रहो गुज्जुभाई’ यू ट्यूबवर सर्वात अधिक पाहण्यात येणारे गुजराती नाटक आहे. ‘गुज्जूभाई बन्या दबंग’ हे गुजराती भाषेतील लोकप्रिय नाटक असून हे नाटक प्रेक्षकांना लोटपोट करते. या नाटकाचे सादरीकरण केवळ आमंत्रितांसाठी करण्यात आले आहे. त्यामुळे सभागृहाचे प्रवेशद्वार रात्री ८.१५ वाजता बंद करण्यात येणार आहे. उशिरा येणाऱ्यांना प्रवेश पास असल्यानंतरही नाटक बघण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे रसिकांनी वेळेच्या आत नाटकाच्या स्थळी पोहचण्याची विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. ज्यांना प्रत्यक्ष बघता येणार नाही, त्यांच्यासाठी देशपांडे सभागृहाच्या प्रांगणात स्क्रीन लावण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)