स्वच्छतागृहातील गटारगंगा रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:12 AM2021-08-23T04:12:02+5:302021-08-23T04:12:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : शहरातील अनेक ठिकाणच्या स्वच्छतागृहाच्या पाईपलाईनमधून तसेच चेंबरमधील गटारगंगा रस्त्यावर वाहत असून, या गंभीर प्रकाराकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : शहरातील अनेक ठिकाणच्या स्वच्छतागृहाच्या पाईपलाईनमधून तसेच चेंबरमधील गटारगंगा रस्त्यावर वाहत असून, या गंभीर प्रकाराकडे नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अनेक ठिकाणी घाण पाणी रस्त्यावर साचून राहिल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात सर्वत्र साथीच्या रोगाचे थैमान सुरू आहे. डेंग्यू, मलेरिया, फायलेरिया, काविळ, टायफाईड यांसारख्या रोगाच्या तापाने अनेक जण फणफणत आहेत. अशावेळी औषधांची आणि तणनाशकांची फवारणी करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच शहरात फाॅगिंग मशीनद्वारे धुरळणी याेग्यरित्या करावी, असेही उमरेड पालिकेचे प्रभारी उपमुख्याधिकारी धनराज पाटील यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी कैलास वारे, मोहन चिटणवीस, रवी शहारे, महादेव भुजाडे, दुर्योधन मोहीनकर, देवीदास शेलकर, नरेश वानखेडे, नितेश मेश्राम, संजय बन्सल, विशाल वारे, विष्णू शेरकी, अमित मेश्राम आदींची उपस्थिती होती.