‘कॅट’मध्ये नीलय ‘टॉप’
By admin | Published: January 12, 2016 02:52 AM2016-01-12T02:52:01+5:302016-01-12T02:52:01+5:30
देशातील प्रख्यात व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम’मध्ये (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट) प्रवेशासाठी आयोजित करण्यात आलेल्या..
Next
नागपूर : देशातील प्रख्यात व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम’मध्ये (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट) प्रवेशासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कॅट’चे (कॉमन अॅप्टिट्यूड टेस्ट) निकाल घोषित झाले आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार नागपूर शहरात नीलय बंग याने ९९.९५ पर्सेंटाईल मिळवत प्रथम स्थान मिळविले आहे. दुसऱ्या स्थानावर रोहित अग्रवाल (९९.४९ पर्सेंटाईल) तर तिसऱ्या स्थानावर आयुषी श्रीवास्तव (९९.२४ पर्सेंटाईल) हे आहेत.