ल्युडो खेळण्याचे आमिष दाखवून तोंडावर, डोळ्यांवर कापड बांधून दोन मुलींवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 07:55 AM2021-05-10T07:55:00+5:302021-05-10T16:12:10+5:30

Nagpur News ल्युडो खेळण्याचे आमिष दाखवून तोंडावर व डोळ्यांवर कापड बांधून दोन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळमना पोलिसांनी आरोपी डोलचंद चव्हाण (५५) यास अटक केली आहे.

Torture of girls in the name of playing ludo | ल्युडो खेळण्याचे आमिष दाखवून तोंडावर, डोळ्यांवर कापड बांधून दोन मुलींवर अत्याचार

ल्युडो खेळण्याचे आमिष दाखवून तोंडावर, डोळ्यांवर कापड बांधून दोन मुलींवर अत्याचार

Next
ठळक मुद्देपोलिसांनी आरोपी डोलचंद चव्हाण (५५) यास अटक केली आहे. पोलिसांनी बलात्कार तथा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. चव्हाणला अटक करण्यात आली आहे.

नागपूर : ल्युडो खेळण्याचे आमिष दाखवून तोंडावर व डोळ्यांवर कापड बांधून दोन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळमना पोलिसांनी आरोपी डोलचंद चव्हाण (५५) यास अटक केली आहे. चव्हाणच्या शेजारी १२ व १० वर्षांच्या दोन पीडित मुली राहतात. त्यांचे आई-वडील मजुरी करतात. शनिवारी दुपारी २ वाजता मुली घरासमोर खेळत होत्या. त्याचवेळी चव्हाण तिथे आला. त्याने मुलींना ल्युडो खेळण्याचे आमिष दाखविले. दोन्ही मुली त्याला आजोबा म्हणून हाक देतात. यामुळे त्याच विश्वासाने त्या त्याच्यासोबत ल्युडो खेळायला तयार झाल्या. चव्हाणच्या घराच्या बाजूलाच एक टिनाचे शेड आहे. चव्हाण दोन्ही मुलींना तिथे घेऊन गेला. दोन्ही मुलींंनी तोंडाला कापड बांधले होते. त्यांना डोळ्यांवरही कापड बांधायला लावले. मुलींनीही तसेच केले. यानंतर चव्हाण एका मुलीशी बळजबरी करू लागला. तोंडावर कापड बांधला असल्याने ती ओरडू शकली नाही.

दरम्यान, शेजारून जाणाऱ्या एका व्यक्तीला टिनाच्या आतून आपत्तीजनक आवाज ऐकू आला. त्याने दरवाजा उघडून पाहिला असता, चव्हाण आपत्तीजनक अवस्थेत होता. त्याने परिसरातील लोकांना घटनेची माहिती दिली. परिसरातील नागरिकांनी चव्हाणची धुलाई केली. चव्हाण तेथून पळाला. मुलीच्या नातेवाइकांनी कळमना पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी बलात्कार तथा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. चव्हाणला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Torture of girls in the name of playing ludo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.