अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आराेपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:09 AM2021-03-05T04:09:14+5:302021-03-05T04:09:14+5:30
काेंढाळी : घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने घरी कुणीही नसताना ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या ...
काेंढाळी : घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने घरी कुणीही नसताना ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रिंगणाबाेडी येथे बुधवारी (दि. ३) दुपारी घडली. या आराेपीस पाेलिसांनी बुधवारी मध्यरात्री अटक केली.
प्रशांत बाळकृष्ण गजभिये (२०, रा. रिंगणाबोडी, ता. काटाेल) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही त्याच्या घराशेजारी राहते. त्याने तिला पाच रुपये देऊन दुकानातून ब्लेड आणायला लावले. ती ब्लेड घेऊन घरी आल्यावर त्याने तिच्यावर त्याच्याच घरी अत्याचार केला. त्यावेळी त्याच्या घरी कुणीही नव्हते. काही वेळाने त्रास जाणवायला सुरुवात झाल्याने तिने हा प्रकार आईला सांगितला. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी सायंकाळी पाेलीस ठाणे गाठून तक्रार नाेंदविली. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास आरोपी प्रशांतला अटक केली. काटाेल येथील न्यायालयाने त्याला एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे, अशी माहिती ठाणेदार विश्वास पुल्लरवार यांनी दिली. या घटनेचा तपास उपविभागीय पाेलीस अधिकारी नागेश जाधव यांच्या मार्गदर्शनात काेंढाळी पाेलीस करीत आहेत.