नागपुरात 'टच फ्री' हात धुण्याचे यंत्र : पीडब्ल्यूडीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 12:23 AM2020-04-18T00:23:50+5:302020-04-18T00:24:25+5:30

वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सार्वजनिक कार्यालयात येणाऱ्या कर्मचारी व अभ्यागतांना हात धुण्यासाठी ‘टच फ्री हात धुण्याचे यंत्र तयार केले आहे.

'Touch free' washing machine in Nagpur: PWD initiative | नागपुरात 'टच फ्री' हात धुण्याचे यंत्र : पीडब्ल्यूडीचा पुढाकार

नागपुरात 'टच फ्री' हात धुण्याचे यंत्र : पीडब्ल्यूडीचा पुढाकार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सार्वजनिक कार्यालयात येणाऱ्या कर्मचारी व अभ्यागतांना हात धुण्यासाठी ‘टच फ्री हात धुण्याचे यंत्र तयार केले आहे. यात हात धुण्यासाठी नळाला हात लावण्याची गरज नाही.
या यंत्राने नळाला व लिक्विड सोपच्या बॉटलला हात न लावता हात धुता येतील. पायांनी पायडल दाबून कुठेही हाताचा स्पर्श न करता नळ व साबण वापरून हात धुणे या यंत्राने शक्य आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रामुख्याने हाताच्या स्पर्शाने होत असतो. ते रोखण्याकरिता हात न लावता साबणाने हात धुण्याचे हे यंत्र अत्यंत प्रभावी असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्याधर सरदेशमुख, जनार्दन भानुसे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रशेखर गिरी व राहुल टेंभुर्णे यांनी एस.एस. बॉडी वर्क्सचे चहल यांच्या मदतीने हे यंत्र तयार केले आहे.

Web Title: 'Touch free' washing machine in Nagpur: PWD initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.