पेंच-बोर व्याघ्र प्रकल्पासह उमरेड कऱ्हांडला पर्यटन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2022 09:10 PM2022-10-07T21:10:54+5:302022-10-07T21:11:28+5:30

Nagpur News पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन गेटवरून १ ऑक्टोबरपासून पर्यटन सुरू करण्यात आले आहे.

Tourism starts in Umred Karhand with Pench-Bor Tiger Reserve | पेंच-बोर व्याघ्र प्रकल्पासह उमरेड कऱ्हांडला पर्यटन सुरू

पेंच-बोर व्याघ्र प्रकल्पासह उमरेड कऱ्हांडला पर्यटन सुरू

googlenewsNext

नागपूर : पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन गेटवरून १ ऑक्टोबरपासून पर्यटन सुरू करण्यात आले आहे.

सफारीकरिता अनुकूल असलेले पर्यटन रस्ते व पावसाची स्थानिक परिस्थिती लक्षात घेता पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी गेट, देवलापार गेट, चोरबाहुली गेट तसेच बोर व्याघ्र प्रकल्पातील बोरधरण पर्यटन गेट आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील कऱ्हांडला व पवनी गेट १५ ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांकरिता ऑफलाइन पध्दतीने गेटवरील वाहन क्षमतेच्या मर्यादेत सफारी सुविधा उपलब्ध राहणार आहे.

या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे, सफारीकरिता पेंच व्याघ्र प्रकल्पात रस्त्याची परिस्थिती लक्षात घेऊन सद्य:स्थितीत पर्यटन झोन सफारीकरिता उपलब्ध राहणार आहे. बोर व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात बोरधरण पर्यटन गेट येथे बोर जलाशयातील पाणी पर्यटन रस्त्यावर आले असल्याने पाण्याची पातळी कमी होईपर्यंत अडेगाव गेट सुरू राहणार नाही. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव पर्यटन झोन रस्ता सफारीकरिता अनुकूल नसल्यामुळे सद्य:स्थितीत बंद राहील. पर्यटकांना ऑनलाइन सफारी बुकिंगची सुविधा १६ ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल.

Web Title: Tourism starts in Umred Karhand with Pench-Bor Tiger Reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ