ग्र्रीन बसमधून विद्यार्थ्यांची पर्यटनस्थळी भ्रमंती
By admin | Published: August 28, 2014 02:05 AM2014-08-28T02:05:25+5:302014-08-28T02:05:25+5:30
शालेय विद्यार्र्थ्यांना पर्यटनस्थळांचे आकर्षण असते. अशा स्थळांना भेट देण्याची त्यांची इच्छा इथेनॉलवरील (ग्रीन) बसच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. बुधवारी महापालिकेच्या सानेगुरुजी उर्दू माध्यमिक
नागपूर : शालेय विद्यार्र्थ्यांना पर्यटनस्थळांचे आकर्षण असते. अशा स्थळांना भेट देण्याची त्यांची इच्छा इथेनॉलवरील (ग्रीन) बसच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. बुधवारी महापालिकेच्या सानेगुरुजी उर्दू माध्यमिक शाळेतील ४० विद्यार्र्थ्यांनी या बसमधून शहरातील पर्यटनस्थळी भ्रमंती करण्याचा आनंद लुटला.
महापौर अनिल सोले यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी सहलीला सुरुवात केली. मनपातील सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त, परिवहन व्यवस्थापक व उपायुक्त संजय काकडे, हनुमाननगर झोनच्या सभापती सारिका नांदूरकर, रश्मी फडणवीस, दिव्या घुरडे, प्रभा जगनाडे, नगरसेवक राजेश घोडपागे, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, शाळेचे मुख्याध्यापक डब्ल्यू.एस. मून व शाळेचे शिक्षक सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी या ग्रीन बसमधून प्रवास करून शहरातील रमण विज्ञान केंद्र, मध्यवर्ती संग्रहालय, विधानभवन, रिझर्व्ह बँक, उच्च न्यायालय ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क आदी ठिकाणी भेटी दिल्या. स्कॅनिया कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर मनपाला ही बस उपलब्ध केली आहे. या बसमधून शहरातील ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना पर्यटनस्थळाला भेटी देण्याचा मनपातर्फे उपक्र म राबविला जात आहे. (प्रतिनिधी)