व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज टाकून तो बसला धावत्या मालगाडीच्या रुळावर ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:19 PM2018-10-12T23:19:08+5:302018-10-12T23:20:20+5:30

शुक्रवारी रात्री २ वाजता एक ३५ वर्षाचा युवक नागपूर रेल्वेस्थानकावर आला. रेल्वे रुळावर बसून त्याने एक सेल्फी घेऊन ‘अलविदा दोस्तो’ असा मॅसेज व्हॉट्सअ‍ॅपवर मित्रांना टाकला. थोड्या वेळात या रुळावरून मालगाडी मुंबईकडे जात होती. युवकाला पाहून मालगाडीच्या लोकोपायलटने ब्रेक मारल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मालगाडीचा थोडा धक्का लागल्यामुळे हा युवक किरकोळ जखमी झाला.

On the track of a moving freight train by loading a message on Whatsapp ... | व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज टाकून तो बसला धावत्या मालगाडीच्या रुळावर ...

व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज टाकून तो बसला धावत्या मालगाडीच्या रुळावर ...

googlenewsNext
ठळक मुद्देलोकोपायलट सतर्क नसता तर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी रात्री २ वाजता एक ३५ वर्षाचा युवक नागपूररेल्वेस्थानकावर आला. रेल्वे रुळावर बसून त्याने एक सेल्फी घेऊन ‘अलविदा दोस्तो’ असा मॅसेज व्हॉट्सअ‍ॅपवर मित्रांना टाकला. थोड्या वेळात या रुळावरून मालगाडी मुंबईकडे जात होती. युवकाला पाहून मालगाडीच्या लोकोपायलटने ब्रेक मारल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मालगाडीचा थोडा धक्का लागल्यामुळे हा युवक किरकोळ जखमी झाला.
महाल येथील रहिवासी विलास (बदललेले नाव) शुक्रवारी रात्री २ वाजता मानसिक तणावातून नागपूर रेल्वेस्थानकावर आला. काही वेळानंतर तो मुंबई एण्डकडील भागात आर. आर. आय. कॅबिनजवळच्या रेल्वे रुळावर बसला. रुळावर बसल्याचा सेल्फी त्याने काढला. काढलेला फोटो त्याने मित्र, नातेवाईकांना पाठवून ‘अलविदा दोस्तो’ असा मॅसेज पाठविला. तो रुळावर बसून असताना यार्डातील निघालेली मालगाडी मुंबईकडे जात होती. नशीब बलवत्तर म्हणून मालगाडीच्या लोकोपायलटला तो दुरुनच दिसल्यामुळे त्याने जोरात ब्रेक लावला. मालगाडी अगदी त्याच्या जवळ येऊन थांबली. यात विलासला थोडा मार लागल्याने तो किरकोळ जखमी झाला. याबाबत सूचना मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विलासला रुळावरून बाजूला नेऊन रेल्वेच्या डॉक्टरांना पाचारण केले. प्रथमोपचार सुरु असतानाच विलासचा व्हॉट्सअ‍ॅपवरील मॅसेज पाहून त्याचे नातेवाईक आणि मित्र रेल्वेस्थानकावर पोहोचले. रुग्णवाहिकेने विलासला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोकोपायलटच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला.

Web Title: On the track of a moving freight train by loading a message on Whatsapp ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.