रखडलेले प्रकल्प मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:29 AM2017-10-04T01:29:34+5:302017-10-04T01:30:06+5:30

महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे प्रलंबित असणारे प्रकल्प महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात.

Track the projected projects | रखडलेले प्रकल्प मार्गी लावा

रखडलेले प्रकल्प मार्गी लावा

Next
ठळक मुद्देमनपा अधिकाºयांना निर्देश : दटके समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे प्रलंबित असणारे प्रकल्प महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. नागनदी प्रकल्प, डिंक दवाखाना व आॅरेंज स्ट्रीट असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. केंद्र व राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या महापालिकेच्या प्रकल्पांना गती देण्याकरिता महापौरांनी माजी महापौर प्रवीण दटके यांची समिती गठित केली आहे. महापौर कक्षात मंगळवारी समितीची बैठक घेण्यात आली.
यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, प्रवीण दटके, आमंत्रित सदस्य स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती संजय बंगाले, नगरसेवक पिंटू झलके, आयुक्त अश्विन मुदगल, प्रतोद दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त रिजवान सिद्दिकी, आयुक्त रवींद्र कुंभारे, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे, नगररचना सहायक संचालक सुप्रिया थूल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, स्थावर अधिकारी आर. एस. भुते आदी उपस्थित होते.
समितीने अधिकाºयांकडून प्रलंबित प्रकल्पांची माहिती घेतली. ह्या प्रकल्पांतील अडचणी तातडीने दूर करून मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा झाली. समितीची पुढील बैठक ५ आॅक्टोबरला होणार आहे. यात बीओटी आणि पीपीपी वर आधारित प्रकल्पांची माहिती घेऊन प्रकल्प मार्गी लावण्यावर चर्चा केली जाणार आहे.

Web Title: Track the projected projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.