ट्रॅक्टर-माेटरसायकलची आपसात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:07 AM2021-07-02T04:07:52+5:302021-07-02T04:07:52+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टर व माेटरसायकलची आपसात जाेरात धडक झाली. त्यात गंभीर जखमी ...

Tractor-motorcycle collision | ट्रॅक्टर-माेटरसायकलची आपसात धडक

ट्रॅक्टर-माेटरसायकलची आपसात धडक

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टर व माेटरसायकलची आपसात जाेरात धडक झाली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा उपचाराला नेताना वाटेतच मृत्यू झाला. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काटाेल-सावरगाव मार्गावरील शासकीय आयटीआयजवळ गुरुवारी (दि. १) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.

नारायण वासुदेव बाभुळकर (६५, रा. मोरडोंगरी, ता. पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे. ते त्यांच्या नातेवाईकांकडे तेरवीच्या कार्यक्रमासाठी काटाेलला आले हाेते. कार्यक्रम आटाेपल्यानंतर ते एमएच-४०/बी-१९०३ क्रमांकाच्या माेटरसायकलने गावाला परत जायला निघाले. दरम्यान, शासकीय आयटीआयजवळ विरुद्ध दिशेने विटा घेऊन येणाऱ्या एमएच-४०/एल-२४७९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरसाेबत त्यांच्या माेटरसायकलची जाेरात धडक झाली.

यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर काटाेल शहरातील ग्रामीण रुग्णालयात प्रथमाेचार करून नागपूरला रवाना करण्यात आले. मात्र, त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला. या घटनेचा तपास पाेलीस कर्मचारी आर. चव्हाण करीत आहेत.

010721\img-20210701-wa0205.jpg

ट्रॅक्टर व दुचाकी ची अमोरासमोर धडक

Web Title: Tractor-motorcycle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.