नागपूर जिल्ह्यात ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली; १४ ऊस ताेडणी कामगार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 10:18 PM2022-01-01T22:18:19+5:302022-01-01T22:18:44+5:30

Nagpur News वेगात जात असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्राॅली उलटल्या आणि त्या ट्राॅलीस बसून प्रवास करणारे १४ ऊस ताेडणी कामगार जखमी झाले.

Tractor trolley overturns in Nagpur district; 14 sugarcane workers injured | नागपूर जिल्ह्यात ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली; १४ ऊस ताेडणी कामगार जखमी

नागपूर जिल्ह्यात ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली; १४ ऊस ताेडणी कामगार जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देआमडी फाटा-पारशिवनी राेडवरील घटना

नागपूर : वेगात जात असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्राॅली उलटल्या आणि त्या ट्राॅलीस बसून प्रवास करणारे १४ ऊस ताेडणी कामगार जखमी झाले. विशेष म्हणजे, या ट्रॅक्टरला दाेन ट्राॅली जाेडल्या हाेत्या. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पारशिवनी-आमडी फाटा राेडवरील नयाकुंड शिवारात शनिवारी (दि. १) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.

जखमी कामगारांमध्ये संजना दुर्गेश खुसराम, नव्या हरिसिंग यादव, जय हरिसिंग यादव, ऊर्मिला मरावी, पणकू सुंदरलाल टेंभरे, सहनूसिंग मरावी, जानकी यादव, हेमलता मरावी, पप्पी पुसाम, पूजा जयसिंग यादव, रोशनी घुमकेती, कलावती पवार, सुकळी टेंभरे व रोशनी घुमकेती यांचा समावेश आहे. हे सर्व ऊस ताेडणी कामगार असून, मध्य प्रदेशातील डिंडाेरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

हे सर्व कामगार माैदा तालुक्यात ऊस ताेडणीच्या कामासाठी आले हाेते. ते शनिवारी सायंकाळी एमएच-२६/बीक्यू-३५६७ क्रमांकाच्या ट्रॅक्टरला जाेडलेल्या दाेन ट्राॅलींमध्ये बसून पारशिवनी तालुक्यातून मध्य प्रदेशात परत जात हाेते. दरम्यान, पारशिवनी-आमडी फाटा राेडवरील नयाकुंड (ता. पारशिवनी) शिवारातील पेंच नदीच्या पुलाजवळ या दाेन्ही ट्राॅली उलटल्या. यात ट्राॅलींमधील १४ कामगार जखमी झाले.

चालकाने पुलाजवळ अचानक ब्रेक दाबल्याने मागची ट्राॅली पुढच्या ट्राॅलीवर आदळली आणि दाेन्ही ट्राॅली उलटल्या, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. माहिती मिळताच पाेलिसांसह नागरिकांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी सर्व जखमींना लगेच पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले. सर्व कामगारांची प्रकृती स्थिर व धाेक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Tractor trolley overturns in Nagpur district; 14 sugarcane workers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात