वाहतूक पोलिसाचा जॅमर चोरणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:09 AM2020-12-24T04:09:14+5:302020-12-24T04:09:14+5:30

नागपूर: वाहतूक पोलिसांचा जॅमर घेऊन फरार झालेल्या बीएमडब्ल्यूच्या मालकास सदर पोलिसांनी अटक केली. दीपक लेडवानी, रा. मेघधनुष्य अपार्टमेंट जरीपटका ...

Trader arrested for stealing traffic police jammer | वाहतूक पोलिसाचा जॅमर चोरणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

वाहतूक पोलिसाचा जॅमर चोरणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

Next

नागपूर: वाहतूक पोलिसांचा जॅमर घेऊन फरार झालेल्या बीएमडब्ल्यूच्या मालकास सदर पोलिसांनी अटक केली. दीपक लेडवानी, रा. मेघधनुष्य अपार्टमेंट जरीपटका असे आरोपीचे नाव आहे. दीपकचे सीताबर्डीत मोबाईलचे दुकान आहे. जॅमर चोरीची घटना १ डिसेंबर रोजी दुपारी घडली होती. दीपकने त्याची बीएमडब्ल्यू कार एमएच-३१-एफए-३९११ ही माऊंट रोडवरील नो पार्किंगमध्ये उभी केली होती. सदर वाहतूक शाखेचे सईद अहमद यांनी कारला जॅमर लावला. तसेच कारच्या ग्लासवर आपला मोबाईल नंबर असलेले कागद चिकटविले. परंतु दीपक जॅमर घेऊन फरार झाला. खूप वेळ होऊनही त्याचा फोन न आल्याने अहमद यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता आरोपी जॅमरसह कार घेऊन फरार झाल्याचे आढळून आले. वाहतूक पोलिसांनी दीपकशी संपर्क साधून त्याला दंड भरायला लावला. परंतु त्याने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने मंगळवारी जॅमर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी दीपकला अटक करून न्यायालयासमोर सादर करण्यात आले. पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली. परंतु आरोपीच्या वकिलाने जॅमर व कार पोलिसांना सोपवण्यात येईल, असे सांगून कोठडीचा विरोध केला. यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले.

Web Title: Trader arrested for stealing traffic police jammer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.