व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना लावला १.४१ काेटीने चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:06 AM2021-07-04T04:06:50+5:302021-07-04T04:06:50+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक/देवलापार : रामटेक येथील कासमिया ट्रेडर्स नामक फर्मने रामटेक व पारशिवनी तालुक्यातील ३४ शेतकऱ्यांकडून धान, गहू ...

The trader planted 1.41 kt of lime to the farmers | व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना लावला १.४१ काेटीने चुना

व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना लावला १.४१ काेटीने चुना

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक/देवलापार : रामटेक येथील कासमिया ट्रेडर्स नामक फर्मने रामटेक व पारशिवनी तालुक्यातील ३४ शेतकऱ्यांकडून धान, गहू व हरभऱ्याची माेठ्या प्रमाणात खरेदी केली. फर्म मालकाने खरेदीपाेटी काही रक्कम शेतकऱ्यांना दिली आणि उर्वरित १ काेटी ४० लाख ७२ हजार २७५ रुपये देण्यास टाळाटाळ करणे सुरू केले. या शेतकऱ्यांना त्यांच्या चुकाऱ्याची रक्कम तातडीने मिळवून द्यावी, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार बाळासाहेब मस्के व ठाणेदार प्रमाेद मकेश्वर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

शेख सलमान छवारे व शेख कादिर छवारे हे कासमिया ट्रेडर्स नामक फर्मचे मालक आहेत. दाेघेही या फर्मच्या माध्यामातून शेतकऱ्यांकडून विविध शेतमाल खरेदी करतात. या दाेघांनीही सन २०१९-२० च्या हंगामात रामटेक व पारशिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून गहू, हरभरा व धानाची माेठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यांनी शेतकऱ्यांना चुकाऱ्यातील थाेडीफार रक्कम दिली आणि उर्वरित रक्कम नंतर देणार असल्याचे सांगितले. त्यांनी वर्षभरापासून चुकारे दिले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यासाठी कासमिया ट्रेडर्सने काही शेतकरी व व्यापाऱ्यांसाेबत धान्य खरेदी-विक्री व्यवहाराचे हमीपत्रही करवून घेतले हाेते. मात्र, दीड वर्षांपासून उर्वरित चुकारे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सध्या आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी तसेच पिकांची मशागत करण्यासाठी पैशाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना त्यांचे उर्वरित चुकारे तातडीने मिळवून द्यावे, अशी मागणीही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी, पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे, दत्तू दिवटेलवार, अनिल कोल्हे, किशोर रहांगडाले, संजय मुलमुले, चरणसिंग यादव, राजेश जयस्वाल यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचा समावेश हाेता.

....

शेतकऱ्यांचे थकीत चुकारे

कासमिया ट्रेडर्सकडे यशवंत बागडे, नगरधन, ता. रामटेक यांचे १ लाख ७० हजार रुपये, किशोर रहांगडाले, रामटेक यांचे सात लाख, रूपचंद डडोरे, बिजेवाडा यांचे चार लाख, धनपाल नागपुरे, सालई यांचे २ लाख २२ हजार, आत्माराम उरकुडे, साटक यांचे तीन लाख, विलास कुंभलकर, साटक यांचे ३ लाख २० हजार, नीतेश टेहरिया, नायबी यांचे २० लाख, ताराचंद मायवाडे, हिवरी यांचे ३० हजार, सियाराम भारद्वाज यांचे २५ हजार, संतोष ठाकरे, नांदगाव यांचे ६ लाख ३० हजार, विष्णू हिवसे, तेलंगखेडी यांचे ३ लाख ५० हजार, किशोर काळे यांचे ५ लाख ५० हजार, अरविंद हिवसे, केरडी यांचे ३ लाख ५० हजार, दिलीप काठोके यांचे १ लाख १५ हजार, विनोद पायतोडे यांचे १ लाख ४२ हजार, बाळकृष्ण वेगी, चांपा यांचे ३५ हजार, सत्यनारायण रेड्डी यांचे २ लाख ७० हजार, मेडापट्टी यांचे २ लाख ४० हजार, ताता रेड्डी यांचे ३ लाख ९२ हजार, व्ही. श्रीनिवास रेड्डी यांचे २ लाख ८५ हजार, ईश्वर रेड्डी यांचे ३५ हजार, विलास बुल्ले यांचे पाच हजार, श्रीनिवास वाकल पुडी यांचे १ लाख ९० हजार, दामू मोटघरे, तेलंगखेडी यांचे ११ हजार, लक्ष्मीनारायण नागरेड्डी, डुमरी यांचे २ लाख ३० हजार, व्यंकटेश्वरराव यामना यांचे १ लाख २ हजार, व्यंकटराव सराडकर, नरसाळा यांचे सहा लाख, अंकुश मोहने, नायबी यांचे आठ लाख, गोपाल गोंगले, टिमकेपार यांचे १० लाख ५० हजार, विलास कुंभलकर, साटक यांचे १ लाख ८४ हजार २७५, लक्ष्मण महाजन, चौगान यांचे ४ लाख ७५ हजार व पिंटू फुलझले यांचे दाेन लाख रुपये असे एकूण १ काेटी ४० लाख ७२ हजार २७५ रुपये थकीत आहेत.

...

आपण २८ एप्रिल २०२० राेजी हमीपत्र करून कासमिया ट्रेडर्स या फर्मला प्रति क्विंटल २,६०० रुपये दराने ९१३ क्विंटल धान विकला. या धानाची एकूण किंमत २३ लाख ७५ हजार ३६० रुपये झाली हाेती. कासमिया ट्रेडर्सने यातील २ लाख ५० हजार रुपये दिले असून, उर्वरित २१ लाख २५ हजार ३६० रुपये अद्यापही दिले नाही.

- दत्तू दिवटेलवार,

रा. नगरधन, ता. रामटेक.

...

Web Title: The trader planted 1.41 kt of lime to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.