व्यवसाय वाढीसाठी व्यापाऱ्यांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:09 AM2021-02-12T04:09:15+5:302021-02-12T04:09:15+5:30
- प्रवीण खंडेलवाल यांचे आवाहन : स्पर्धेत व्यवसाय वाढीचे टूल नागपूर : देशात विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांच्या स्पर्धेत ठोक आणि ...
- प्रवीण खंडेलवाल यांचे आवाहन : स्पर्धेत व्यवसाय वाढीचे टूल
नागपूर : देशात विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांच्या स्पर्धेत ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी डिजिटल माध्यमांचा अवलंब करून व्यवसाय करावा, असे आवाहन कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी येथे केले.
राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि प्रवीण खंडेलवाल यांनी गुरुवारी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या सिव्हिल लाइन्स येथील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला.
खंडेलवाल म्हणाले, व्यवसायात पारंपरिक साधनांसोबतच डिजिटल माध्यमांचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पुढे यात अनेक बदल दिसून येणार आहेत. अशा स्थितीत व्यापाऱ्यांनी स्पर्धेत व्यवसाय करण्यासाठी स्वत:ला सक्षम बनवावे आणि पारंपरिक साधनांसह आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल माध्यमांचा जास्तीतजास्त उपयोग केला पाहिजे. त्यामुळे ग्राहक आणि शासकीय तंत्रज्ञानासोबत समन्वय साधून व्यवसायात नक्कीच वाढ होणार आहे.
प्रारंभी चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी पाहुण्यांचे स्वागत करून चेंबरचे कार्य आणि उपक्रमांची माहिती दिली. व्यापारी जीएसटीचे पालन करण्यास होणाऱ्या त्रासापासून अजूनही बाहेर आले नाहीत. अशा स्थितीत सरकारने याची दखल घेऊन व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा.
या प्रसंगी चेंबरचे उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, फारुख अकबानी, सचिव रामअवतार तोतला, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव शब्बार शाकिर, स्वप्निल अहिरकर आदी उपस्थित होते.