व्यापाऱ्यांनी रोजगार निर्माता व्हावे; व्यापारी संवाद संमेलनाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 09:34 PM2023-06-17T21:34:48+5:302023-06-17T21:35:11+5:30

Nagpur News नागपूर ही औद्योगिक राजधानी झाली तर शहरातील प्रत्येकाचा विकास होईलच; पण त्यासाठी चांगले औद्योगिक वातावरण तयार करून व्यापाऱ्यांनी रोजगार निर्माता व्हावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

Traders should be job creators; Organization of business dialogue meeting | व्यापाऱ्यांनी रोजगार निर्माता व्हावे; व्यापारी संवाद संमेलनाचे आयोजन

व्यापाऱ्यांनी रोजगार निर्माता व्हावे; व्यापारी संवाद संमेलनाचे आयोजन

googlenewsNext

 

नागपूर : नागपूर ही औद्योगिक राजधानी झाली तर शहरातील प्रत्येकाचा विकास होईलच; पण त्यासाठी चांगले औद्योगिक वातावरण तयार करून व्यापाऱ्यांनी रोजगार निर्माता व्हावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

नागपूर महानगर भाजपच्या वतीने रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात व्यापारी संवाद संमेलनाचे आयोजन शनिवारी करण्यात आले. यावेळी नितीन गडकरी यांनी व्यापारी बंधूंशी संवाद साधला.

मंचावर शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, माजी खा. अजय संचेती, आ. विकास कुंभारे, माजी आ. गिरीश व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ सदस्य घनश्याम कुकरेजा, पराग सराफ, आसीन खान उपस्थित होते. गडकरी यांच्या हस्ते विविध बँकांच्या कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

गडकरी यांनी व्यापाऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याचे आवाहन केले. सरकारच्या वतीने शक्य तेवढी मदत केली जाईल आणि त्या अडचणी सोडविण्यात येतील. तुम्ही शहरातील अर्थव्यवस्था वाढीस लावली तर रोजगारही वाढणार आहे, असे गडकरी म्हणाले.

अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान

कोरोना काळात अनेक व्यापारी बंधू नागपूरकरांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी केलेली मदत कुणालाही विसरता येणार नाही, या शब्दांत गडकरी यांनी व्यापारी वर्गाचे कौतुकही केले. नागपूरच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यापाऱ्यांचा सत्कार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

कार्यकर्त्यांमुळे नेत्यांचा थाट

नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्र्यांचा थाट कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून आणि जनतेच्या प्रेमातून आलेला असतो. इथे व्यासपीठावर बसलेले लोकप्रतिनिधी जनतेचे नोकर आहेत आणि सभागृहात बसलेली जनता मालक आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.

Web Title: Traders should be job creators; Organization of business dialogue meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.