व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:10+5:302021-06-09T04:11:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध कमी केले आहे. दाेन महिन्यानंतर साेमवारी अनलाॅक सुरू ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध कमी केले आहे. दाेन महिन्यानंतर साेमवारी अनलाॅक सुरू झाल्याने नागरिकांनी दुकानात गर्दी केली. सर्व व्यवहार सुरू झाले असले तरी काेराेनाचा धाेका टळला नाही. यामुळे नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी करू नये, व्यापारी व नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनातर्फे मुख्याधिकारी डाॅ. ऋचा धाबर्डे यांनी केले आहे.
काेराेनाबाधितांची घटती संख्या पाहता व्यापार सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून हाेत हाेती. रुग्णसंख्या घसरल्यानंतर शासनाने अनलाॅक जाहीर केले. परंतु काेराेनाचा संभाव्या धाेका कायम आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करावे. दुकानात गर्दी हाेणार नाही, यासाठी व्यापाऱ्यांनी काळजी घ्यावी. साेबतच फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. दुकानदार, विक्रेते व कामगारांनी लसीकरण करवून घ्यावे, आदी सूचनाही मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
===Photopath===
080621\img_20210608_075651.jpg
===Caption===
मुख्याअधिकारी यांची फोटो