सावनेर बाजार समितीत खरेदी-विक्री व्यवहार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:09 AM2021-05-18T04:09:45+5:302021-05-18T04:09:45+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण हाेताच, बाजार समितीतील शेतमाल खरेदी-विक्री व्यवहार ...

Trading in Savner Market Committee started | सावनेर बाजार समितीत खरेदी-विक्री व्यवहार सुरू

सावनेर बाजार समितीत खरेदी-विक्री व्यवहार सुरू

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण हाेताच, बाजार समितीतील शेतमाल खरेदी-विक्री व्यवहार बंद ठेवण्यात आले हाेते. मार्केट यार्ड पुन्हा सुरू करण्यात आल्याने खरेदी-विक्री व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या आर्थिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बाजारात काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन केले जात असल्याची माहिती बाजार समिती व्यवस्थापनाने दिली.

बाजार समितीतील व्यवहार मध्यंतरी बंद असल्याने, शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यास अडचणी जात हाेत्या, शिवाय काहींना त्यांच्याकडील शेतमाल नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागतो. कर्मचारी काेराेना संक्रमित झाल्याने, बाजार काही दिवस बंद ठेवण्यात आला हाेता. त्यानंतर, बाजार सुरू करण्यात येणार असल्याची सूचनाही शेतकऱ्यांना देण्यात आली. त्या अनुषंगाने गरजू शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील शेतमाल बाजार समितीच्या यार्डात विकायला आणायला सुरुवात केली. साेमवारी विनोद जैन, बंडू बावरे, किशोर बावरे, बबलू जैन, सिब्बू शेख, एन.टी. शेख, अडते रमेश मौजे, अरुण मौजे, बाजार समितीचे कर्मचारी रोशन मेघे, राकेश चौधरी यांच्या उपस्थितीत शेतमाल खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण करण्यात आले.

....

६५, ९७४ क्विंटल शेतमालाची खरेदी

सावनेर बाजार समितीत १ ते ३० एप्रिल या काळात ४६,२५३ क्विंटल तर १ ते १७ मे या काळात १९,७२१ क्विंटल अशा एकूण ६५,९७४ क्विंटल शेतमालाची खरेदी करण्यात आली. १ ते ३० एप्रिल या काळात १३७ क्विंटल साेयाबीन, १५,६४२ क्विंटल तूर, ६,५०७ क्विंटल हरभरा, १,७३१ क्विंटल गहू, ५३५ क्विंटल मका, ४१,४३८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. साेमवारी (दि. १७) या बाजारात ५,०० ते ६,००० रुपये प्रति क्विंटल साेयाबीन, ६,३०० ते ६,७०० रुपये प्रति क्विंटल तूर, ४,८०० ते ४,९५० रुपये प्रति क्विंटल हरभरा, १,७०० ते २,१०० रुपये प्रति क्विंटल गव्हाचे दर हाेते.

===Photopath===

170521\img_20210517_130454.jpg

===Caption===

सावनेर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड वर शेतमाल खरेदी करताना व्यापारी विनोद जैन बंडू बावरे किशोर बावरे बबलू जैन सिब्बू शेख अडते रमेश मौजे अरुण मौजे अन्य अडते कर्मचारी रोशन मेघे राकेश चौधरी

आणि शेतकरी दिसत आहे

Web Title: Trading in Savner Market Committee started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.