सिमेंट रोड बांधकामाकरिता वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:07 AM2021-03-23T04:07:51+5:302021-03-23T04:07:51+5:30

नागपूर : सिमेंट रोड बांधकामाकरिता सहकारनगर घाट (पूल) ते ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौकापर्यंत डाव्या बाजूची वाहतूक ...

Traffic closed for cement road construction | सिमेंट रोड बांधकामाकरिता वाहतूक बंद

सिमेंट रोड बांधकामाकरिता वाहतूक बंद

googlenewsNext

नागपूर : सिमेंट रोड बांधकामाकरिता सहकारनगर घाट (पूल) ते ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौकापर्यंत डाव्या बाजूची वाहतूक बंद करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

मनपाच्या सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्पांतर्गत सहकारनगर घाट (पूल) ते ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौकापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने १ एप्रिल ते ३१ जुलै २०२१ या कालावधीमध्ये उपरोक्त मार्गाच्या डाव्या बाजूकडील मार्ग बंद करण्यात येईल. सदर मार्ग उजव्या बाजूने वळविण्यात येणार आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी सूचना फलक लावून काम सुरू झाल्याची व पूर्ण करण्याचा दिनांक नमूद करणे, कंत्राटदाराने स्वतःचे नाव व संपर्क क्रमांकाचा फलक लावणे, पर्यायी मार्ग सुरू होण्याच्या व संपण्याच्या ठिकाणी तसेच बॅरिकेड्सजवळ सुरक्षा रक्षक किंवा स्वयंसेवक नेमण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

Web Title: Traffic closed for cement road construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.