माेकाट गुरांच्या ‘चक्का जाम’मुळे वाहतूक काेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:17 AM2021-09-02T04:17:26+5:302021-09-02T04:17:26+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : शहरातील मुख्य व अंतर्गत राेडवरील माेकाट गुरांची समस्या सामान्य झाली आहे. शहरातून जाणाऱ्या नागपूर-छिंदवाडा-बैतुल ...

Traffic jams due to ‘Chakka Jam’ of Maekat cattle | माेकाट गुरांच्या ‘चक्का जाम’मुळे वाहतूक काेंडी

माेकाट गुरांच्या ‘चक्का जाम’मुळे वाहतूक काेंडी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : शहरातील मुख्य व अंतर्गत राेडवरील माेकाट गुरांची समस्या सामान्य झाली आहे. शहरातून जाणाऱ्या नागपूर-छिंदवाडा-बैतुल महामार्गालगतच्या विश्रामगृहासमोर मंगळवारी (दि. ३१) दुपारी माेकाट गुरांच्या कळपाने ठिय्या मांडला. गुरांच्या या ‘चक्का जाम’मुळे वाहतूक खाेळंबली हाेती. शहरात ही समस्या वारंवार उद्भवत असली तरी स्थानिक नगर परिषद प्रशासन कायमस्वरूपी उपाययाेजना करायला तयार नसल्याने नागरिक वैतागले आहेत.

माेकाट गुरांचा हा कळप सावनेर शहरातील खापा मार्ग चौकापासून तर पलीकडे विश्रामगृहापर्यंत पांगला हाेता. एकाच वेळी एवढ्या माेठ्या प्रमाणात गुरे एकाच ठिकाणी आल्याने नवल व्यक्त केले जात हाेते. ही जनावरे जवळजवळ उभी हाेती तर काही गुरे राेडच्या मध्यभागी निवांत झाेपली हाेती. त्यामुळे सतत वर्दळीच्या असलेल्या या राेडवर गुरांमधून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलाच त्रास झाला.

छिंदवाडा, बैतूल, भाेपाळ, दिल्ली, जबलपूर, अमरावती तसेच नागपूरच्या दिशेने जाणारी सर्व वाहने याच राष्ट्रीय महामार्गावरून धावतात. गुरांच्या या कळपामुळे तसेच ही गुरे हाकलून अथवा वाहनांच्या हाॅर्नच्या आवाजामुळे बाजूला हाेत नसल्याने माेठी पंचाईत झाली हाेती. शहरात माेकाट गुरांचा वावर व त्रास प्रचंड वाढल्याने नगर पालिका प्रशासनाने ही माेकाट गुरे पकडून त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी. प्रसंगी त्यांचा लिलाव करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Traffic jams due to ‘Chakka Jam’ of Maekat cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.