एकीकडे रस्त्याचे बांधकाम, दुसरीकडे लागतो जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 12:57 PM2021-11-26T12:57:08+5:302021-11-26T13:03:48+5:30
दिघोरी ते शितला माता मंदिरादरम्यान रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामात लेटलतिफी होत आहे. एकीकडील रस्ता बंद असल्यामुळे दोन्हीकडील वाहने एकाच बाजूने समोरासमोर येत आहेत. यामुळे गर्दी वाढून जामची स्थिती निर्माण होत आहे.
नागपूर : दिघोरी येथील उमरेड मार्गावर सिमेंट रोड तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. दिघोरी येथून सक्करदरा शितला माता मंदिर चौकापर्यंत दुसऱ्या बाजूने रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे वाहनचालकांना एकीकडे रस्ता तयार करण्याचे काम आणि दुसरीकडे ‘जाम’चा सामना करावा लागत आहे.
दिघोरी ते शितला माता मंदिरादरम्यान जाताना नागरिक आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचत नसल्याची स्थिती आहे. एकीकडे रस्ता तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर दुसरीकडे रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु वाहनांमुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या दुसऱ्या बाजूला रस्ता तयार करण्यासाठी या रस्त्याला वन वे करण्यात आले आहे. दुकानात होणारी गर्दी आणि बसेसची वाहतूक यामुळे या मार्गावर कार चालक तसेच दुचाकी चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वन वे रस्त्यावरून पायदळ चालणाऱ्या नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. बाजारातून निघणाऱ्या नागरिकांना सांभाळूनच रस्त्यावर चालावे लागत आहे.
तुकड्यात होत आहे का?
स्थानिक नागरिकांच्यामते रस्ता तयार करण्याचे काम तुकड्यात करण्यात येत आहे. यामुळे या मार्गावर जागोजागी काम सुरू आहे. वाहनांच्या लांब रांगांसोबत अपूर्ण कामामुळे अपघात होत आहेत. प्रदीर्घ कालावधीपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामात लेटलतिफी होत आहे. एकीकडील रस्ता बंद असल्यामुळे दोन्हीकडील वाहने एकाच बाजूने समोरासमोर येत आहेत. यामुळे गर्दी वाढून जामची स्थिती निर्माण होत आहे.