विनापरवाना ११०९ विद्यार्थी, पालकांवर चालान कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 02:02 AM2017-07-27T02:02:17+5:302017-07-27T02:03:04+5:30

वाहतूक पोलिसांनी विना परवाना वाहन चालविणाºया अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध मोहीम राबवून ३०९ वाहनांना ताब्यात घेतले आहे.

Traffic Police | विनापरवाना ११०९ विद्यार्थी, पालकांवर चालान कारवाई

विनापरवाना ११०९ विद्यार्थी, पालकांवर चालान कारवाई

Next
ठळक मुद्देआणखी तीन दिवस चालणार वाहतूक पोलीस विभागाची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहतूक पोलिसांनी विना परवाना वाहन चालविणाºया अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध मोहीम राबवून ३०९ वाहनांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ११०९ विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांविरुद्ध चालानची कारवाई केली आहे. तीन दिवसांपर्यंत चालणाºया या विशेष मोहिमेमुळे पालकात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी पूर्वीच विना परवाना वाहन चालविणाºयांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती. या मोहिमेंतर्गत वाहतूक पोलिसांनी सकाळी शाळा-महाविद्यालयांसमोर मोहीम सुरू केली. वाहतूक पोलिसांनी ८३६ विद्यार्थी आणि २७३ पालकांविरुद्ध कारवाई केली. कारवाईदरम्यान ३०९ दुचाकी वाहनांना ताब्यात घेण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे पालकांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी विद्यार्थ्यांमार्फत पालकास बोलविले. मुलांनी कारवाई सुरू असल्याचे सांगताच पालक वाहतूक कार्यालयात पोहोचले. पोलिसांनी त्यांचे मार्गदर्शन केले. वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन सोपविल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. यातील अनेक विद्यार्थी विना हेल्मेट वाहन चालवीत होते. अशा पद्धतीने मुलांचा जीव धोक्यात घालून वाहतूक नियमांचे उल्लंघन कितपत योग्य आहे, अशी विचारणा पालकांना करण्यात आली. बहुतांश पालकांनी आपली चूक मान्य केली. शिक्षकांनीही वाहतूक पोलिसांच्या कारवाईची आधीच माहिती दिल्याचे त्यांनी मान्य केले. त्याशिवाय मुलांना वाहन देणे ही आपली चूक असल्याचे पालकांनी कबूल केले. अशी चूक भविष्यात होणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. वाहतूक पोलिसांनी विना परवाना वाहन चालविणाºया, अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध मोटर वाहन कलम १८१ (४) आणि त्यांच्या पालकांविरुद्ध मोटार वाहन कलम १८१(५)नुसार कारवाई केली. ज्या चालकांजवळ कागदपत्र नव्हते त्यांचे वाहन ताब्यात घेण्यात आले. त्यांनी कागदपत्र सोपविल्यानंतर त्यांचे वाहन सोडून देण्यात आले.
नियमांच्या पालनासाठीच मोहीम
वाहतूक पोलिसांची ही मोहीम आणखी तीन दिवस चालणार आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले की, विद्यार्थी आणि पालकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. पालक मुलांच्या जीवितास सहजतेने घेतात. ही चूक त्यांना जीवनभरासाठी महागडी ठरू शकते. अल्पवयीन मुलांनी वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले आहे.
घेत नाहीत धडा
वाहतूक विभागाने यापूर्वीही याबाबत मोहीम सुरू केली होती. कारवाईच्या काही दिवसानंतर पालक सर्वकाही विसरून जातात. मोहीम संपताच वाहतूक पोलिसही शांत होतात. यामुळे परिस्थिती जशास तशी होते. एखादा अपघात घडल्यानंतर त्याबाबत पुन्हा विचार सुरू होतो.
 

Web Title: Traffic Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.