वाहतूक पोलिसाची सीएला बेदम मारहाण

By admin | Published: March 27, 2016 02:42 AM2016-03-27T02:42:10+5:302016-03-27T02:42:10+5:30

हेल्मेट घातले नसल्याचे कारण पुढे करीत सनदी लेखापाल (सीए) असलेल्या तरुणाशी वाद घालून त्याची वाहतूक शाखेच्या पोलिसाने बेदम मारहाण केली.

Traffic Police Seila Breath Beaten | वाहतूक पोलिसाची सीएला बेदम मारहाण

वाहतूक पोलिसाची सीएला बेदम मारहाण

Next

क्षुल्लक कारणावरून वाद : अटकही केली
नागपूर : हेल्मेट घातले नसल्याचे कारण पुढे करीत सनदी लेखापाल (सीए) असलेल्या तरुणाशी वाद घालून त्याची वाहतूक शाखेच्या पोलिसाने बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याला शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली अटकही केली. पंकज घनश्याम ठाकूर (वय २९) असे पोलिसांनी आरोपी बनविलेल्या तरुणाचे नाव आहे.

शनिवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास पंकज त्याच्या काकांना घेऊन दुचाकीने जरीपटक्यातून जात होता. जरीपटका पोलीस ठाण्यासमोरच्या चौकातील सिग्नलवर तो थांबला असता त्याला वाहतूक शाखेच्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने हेल्मेट का घातले नाही, अशी विचारणा केली. त्यानंतर बाजूला उभे असलेल्या दोन पोलीस आणि एका अधिकाऱ्याकडे त्याला पाठविले. दुचाकीची चावी काढून कागदपत्रे मागितल्यामुळे पंकजने ती कागदपत्रे पोलिसांना दिली.

पोलीस ठाण्यात राज्य कुणाचे ?
नागपूर : पोलीस शिपाई अमरदीप गोवर्धन सोळंके (वय ३४) यांनी पंकजला अरेरावीने विचारपूस केली. त्यामुळे पंकजने आपण सीए आहोत, आपल्यासोबत सभ्य भाषेत बोला, असे म्हटले. परिणामी सोळंके दुखावला. त्याने पंकजसोबत वाद घातला आणि त्याच्या कानशिलात लगावली. पंकजसोबत झोंबाझोंबी झाल्यामुळे सोळंके खाली पडला. त्यामुळे त्याला जास्तच चेव आला. त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बाजूलाच असलेल्या जरीपटका पोलीस ठाण्याचा ताफा बोलवून घेतला. त्यानंतर पंकजला त्यांनी जरीपटका ठाण्यात नेऊन त्याची बेदम धुलाई केली.
त्याच्यावर अश्लील शिवीगाळ करून सोळंकेला मारहाण केल्याचा आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले. त्यानंतर जामिनावर तो बाहेर आला. (प्रतिनिधी)

सीसीटीव्ही साक्षीदार
आपला काही दोष नसताना पोलिसांनी आपल्याला एखाद्या गुन्हेगारासारखे बदडले. पोलिसांच्या हा गुंडगिरीचा प्रकार ठाण्यातील सीसीटीव्हीत कैद झाला असून, वरिष्ठांनी तो तपासावा आणि दोषी पोलिसांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पंकजने एका निवेदनातून केली आहे.

Web Title: Traffic Police Seila Breath Beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.