वाहतूक पोलिसांचा रविवारी ‘सायकलोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:32 AM2019-06-29T00:32:13+5:302019-06-29T00:32:56+5:30

उपराजधानीला अपघातमुक्त शहर बनविण्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने शहर वाहतूक पोलिसांनी रविवारी ‘सायकलोत्सव’चे आयोजन केले आहे. या उपक्रमात (रॅलीत) वरिष्ठ अधिकारी आणि १०० पोलिसांसह ३०० ते ४०० सायकलस्वार सहभागी होण्याचा अंदाज आयोजकांनी वर्तविला आहे.

Traffic police Sunday 'cyclostova' | वाहतूक पोलिसांचा रविवारी ‘सायकलोत्सव’

वाहतूक पोलिसांचा रविवारी ‘सायकलोत्सव’

Next
ठळक मुद्दे१०० पोलिसांसह ४०० सायकलस्वार सहभागी होणार : वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीला अपघातमुक्त शहर बनविण्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने शहर वाहतूक पोलिसांनी रविवारी ‘सायकलोत्सव’चे आयोजन केले आहे. या उपक्रमात (रॅलीत) वरिष्ठ अधिकारी आणि १०० पोलिसांसह ३०० ते ४०० सायकलस्वार सहभागी होण्याचा अंदाज आयोजकांनी वर्तविला आहे.
सायकल चालविल्याने आरोग्य सुदृढ राहते. अपघात घडत नाही. प्रदूषणही होत नाही. उपराजधानीला अपघातमुक्त शहर बनविण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी विविध उपक्रमातून जनजागरण चालविले आहे. शाळा-महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना अपघात टाळण्यासाठी काय करायचे त्यासाठी धडे दिले जात आहे. स्वयंसेवी संस्था-संघटनांचीही यासाठी मदत घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर, सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सायकल रॅली ‘सायकलोत्सव’चे आयोजन केले आहे. पोलीस जिमखाना येथून सकाळी ६.३० वाजता ही रॅली सुरू होणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय रॅलीला हिरवी झेंडी दाखवतील. ‘सायकलोत्सव’साठी मेट्रोने १०० सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत. या उपक्रमाची माहिती मिळाल्यापासून अनेकांनी रॅलीत सहभागी होण्यासाठी आपली नावनोंदणी सुरू केली आहे. ‘सायकलोत्सव’मध्ये कुणालाही सहभागी होता येणार आहे. इच्छूकांनी स्वत:ची सायकल घेऊन रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत आपले नाव नोंदवावे.
१० किलोमीटरचा प्रवास
‘सायकलोत्सव’मध्ये विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थ्यांसह ३०० ते ४०० पेक्षा जास्त सायकलस्वार सहभागी होण्याची शक्यता पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी वर्तविली आहे. पोलीस जिमखाना, जपानी गार्डन, राजभवन, वायुसेनानगर, फुटाळा, असा १० किलोमीटरचा प्रवास रॅलीत सहभागी सायकलस्वार करतील.

Web Title: Traffic police Sunday 'cyclostova'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.