सिमेंट रोडच्या बांधकामासाठी ९ मार्गावरील वाहतूक प्रतिबंधित

By मंगेश व्यवहारे | Published: May 22, 2024 01:23 PM2024-05-22T13:23:29+5:302024-05-22T13:23:56+5:30

Nagpur : मनपा आयुक्तांचे आदेश

Traffic restricted on 9th lane for construction of cement road | सिमेंट रोडच्या बांधकामासाठी ९ मार्गावरील वाहतूक प्रतिबंधित

Traffic restricted on 9th lane for construction of cement road

नागपूर :  महानगरपालिकेद्वारे ९ रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी या मार्गांवरील वाहतूक प्रतिबंधित करण्यात येणार असल्याचा आदेश महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी काढला. या रस्त्यांमध्ये मनिषनगर रेल्वे क्रॉसिंग ते पावनभूमी मुख्य रस्ता व महादेव मंदिर रस्ता, हंम्पयार्ड रोड ते लोकमत चौक (बलराज मार्ग) आणि आनंद टॉकीज ते धंतोली पोलीस स्टेशन, देवनगर चौक ते स्वामी विवेकानंद चौक ते गजानन नगर, भारत पेट्रोल पंप, फुटबाल गाऊंडपर्यंत, जय दुर्गा ट्रेवर्ल्स ते आरबीआई कॉलोनी, जयप्रकाश नगर, न्यु स्नेह नगर खामला रोड ते मालवीय नगर, नीरी रोड ते आठ रस्ता चौक आदींचा समावेश आहे.

या सर्व रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी सूचना फलक व काम सुरू केल्याची व काम पूर्ण करण्याची दिनांक नमूद करावे. तसेच कंत्राटदाराने स्वतःचा पत्ता व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक असलेला बोर्ड लावावे. पर्यायी मार्ग सुरू होतो त्याठिकाणी दोन्ही टोकावर बॅरीकेटस तसेच वाहतुक सुरक्षा रक्षक  नेमावे. बांधकामादरम्यान मार्गावरील रस्त्यावर झालेले खड्डे तात्काळ बुजवून त्यावर सिमेंटीकरण डांबरीकरण करून रोड पूर्ववत करावा, आदी सूचना आदेशात दिल्या आहे.

Web Title: Traffic restricted on 9th lane for construction of cement road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर