नागपुरात वाहतूक सिग्नल दोन महिन्यानंतर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 07:33 PM2020-05-18T19:33:14+5:302020-05-18T19:35:42+5:30
चौथा लॉकडाऊन जाहीर करीत असतानाच सरकारने काही प्रमाणात शिथिलताही बहाल केलेली आहे. शासकीय व खासगी कार्यालयांसह काही आस्थापना व दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात वाहतूक बऱ्यापैकी सुरु झालेली आहे. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासून बंद पडलेले शहरातील वाहतूक सिग्नलही आज सोमवारपासून सुरु करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चौथा लॉकडाऊन जाहीर करीत असतानाच सरकारने काही प्रमाणात शिथिलताही बहाल केलेली आहे. शासकीय व खासगी कार्यालयांसह काही आस्थापना व दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात वाहतूक बऱ्यापैकी सुरु झालेली आहे. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासून बंद पडलेले शहरातील वाहतूक सिग्नलही आज सोमवारपासून सुरु करण्यात आले आहेत.
२२ मार्च रोजी पहिला लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन वाढवण्यात आला. दरम्यान जीवनावश्यक बाबी सोडून सर्वच बंद असल्याने रस्त्यांवर वाहतूक किरकोळ होती. संपूर्ण पोलीस विभाग लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसह गरजूंना सेवा पूरवण्यात तैनात होता. चौका-चौकांमध्ये पोलीस तैनात होते. त्यामुळे शहरताली सर्वच वाहतूक सिग्नल बंद होते. चौथा लॉकडाऊन ३० मेपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. परंतु १८ मे पासून अनेक दुकाने सुरु झालेली आहेत. शासकीय कार्यालयांसोबतच खासगी कार्यालये व आस्थापनेही सुरु झाली आहे. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या वाढली आहे. चौका-चौकांमध्ये असलेले पोलीसही आता कमी झाले आहेत. त्यामुळे आजपासून शहरातील बहुतांश वाहतूक सिग्नल सुरु झाले आहेत.