न्यायालय आवारात त्रिकोणी संबंधातून हाणामारी

By admin | Published: October 4, 2015 03:27 AM2015-10-04T03:27:49+5:302015-10-04T03:27:49+5:30

एका त्रिकोणी संबंधातून चक्क न्यायालयाच्या आवारात दोन जणांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

The tragedy related to the tragedy in court premises | न्यायालय आवारात त्रिकोणी संबंधातून हाणामारी

न्यायालय आवारात त्रिकोणी संबंधातून हाणामारी

Next

नागपूर : एका त्रिकोणी संबंधातून चक्क न्यायालयाच्या आवारात दोन जणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. न्यायालय सुरक्षा पोलिसांनी वेळीच या दोघांना पकडून सदर पोलिसांच्या स्वाधीन केल्याने संभाव्य मोठी घटनाही टळली.
प्रकरण असे की, जुना कामठी मार्ग गुलशननगर भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय मदनचा आपल्या पत्नीसोबत गेल्या काही दिवसांपासून कलह सुरू आहे. कलहाचे कारण म्हणजे खापरखेडा भागात राहणाऱ्या धर्मेंद्र (२८) हा गेल्या काही दिवसांपासून मदनच्या पत्नीसोबत मोबाईलवर सतत संपर्क करीत आहे. तिला एसएमएस करतो.
ही बाब मदनच्या लक्षात येताच त्याने पत्नीला हटकले धर्मेंद्रबाबत विचारणा केली असता तिने धर्मेंद्र हा आपल्या आत्याचा मुलगा सांगितले होते. त्यामुळे मदन आणखीच संतापला होता. त्याने लागलीच आपल्या घरी नातेवाईकांची पंचायत भरवली होती. मदनच्या पत्नीने धर्मेंद्रसोबत काहीही संबंध नसल्याचे पंचायतीत सांगितले नव्हते. ही बाब मदनने पत्नीला कोर्टात लिहून मागितली असता शनिवारी पती-पत्नी न्यायालयाच्या आवारात शपथपत्र लिहिण्यासाठी आले होते. त्याच वेळी धर्मेंद्रही न्यायालयात आला होता. तो मदनच्या नजरेस पडताच मदन याने त्याच्यावर अक्षरश: झडप घेतली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
धर्मेंद्रनेही त्याचा चांगलाच प्रतिकार केला. दोघांमध्ये जबरदस्त हाणामारी होताना पाहून न्यायालय सुरक्षा चौकीतील पोलीस उपनिरीक्षक जयवंत जाधव, हेड कॉन्स्टेबल मुन्ना ठाकूर, महेंद्रसिंग ठाकूर, अविनाश चव्हाण आणि विलास वाडेकर यांनी दोघांनाही पकडले. त्यावेळी मदनची पत्नीही होती.
तिच्या सांगण्यावरून धर्मेंद्र हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता, असे निष्पन्न झाले. तूर्त सुरक्षा पोलिसांनी या दोघांना सदर पोलिसांच्या स्वाधीन केले.(प्रतिनिधी)

Web Title: The tragedy related to the tragedy in court premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.