बिलासपूरजवळ रेल्वे प्रवाशाला झोपेत सव्वा लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 10:57 AM2017-11-18T10:57:12+5:302017-11-18T10:58:07+5:30

झोपेचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने बरौनी-सिकंदराबाद एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या प्रवाशाचा १.२० लाखाचा मुद्देमाल पळविला.

Train passenger loose 1.5 lakh near Bilaspur | बिलासपूरजवळ रेल्वे प्रवाशाला झोपेत सव्वा लाखाचा गंडा

बिलासपूरजवळ रेल्वे प्रवाशाला झोपेत सव्वा लाखाचा गंडा

Next
ठळक मुद्देबरौनी-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधील घटनाझोपेचा फायदा घेऊन हँडबॅग आणि ट्रॉलीबॅग पळविली

आॅनलाईन लोकमत
नागपूर : झोपेचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने बरौनी-सिकंदराबाद एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या प्रवाशाचा १.२० लाखाचा मुद्देमाल पळविला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी रात्री अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मधुमिता बॅनर्जी (३७) रा. दाभा, नागपूर या रेल्वेगाडी क्रमांक ०७०१० बरौनी-सिकंदराबाद एक्स्प्रेसने (कोच बी-३, बर्थ ४५, ४६, ४८) कुटुंबीयांसह राची ते नागपूर असा प्रवास करीत होत्या. बिलासपूरजवळ अज्ञात आरोपीने त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांची हँडबॅग आणि ट्रॉलीबॅग पळविली. त्यात कानातले रिंग, ३ जोडी टॉप्स, सोन्याचा सेट, सोन्याचे नाणे, बँकेच्या लॉकरची चाबी, एटीएम, पॅनकार्ड असा एकूण १ लाख २० हजार ७८३ रुपयांचा मुद्देमाल होता. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Train passenger loose 1.5 lakh near Bilaspur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :theftचोरी