रेल्वे चालविणार ३७ विशेष पार्सल रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 12:50 AM2020-04-18T00:50:28+5:302020-04-18T00:52:01+5:30
रेल्वेत ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु जीवनावश्यक वस्तू पाठविण्यासाठी मध्य रेल्वेने ३७ विशेष पार्सल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या पार्सल रेल्वेगाड्यात प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेत ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु जीवनावश्यक वस्तू पाठविण्यासाठी मध्य रेल्वेने ३७ विशेष पार्सल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या पार्सल रेल्वेगाड्यात प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रेल्वेत ३ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये विविध भागात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी रेल्वेने विशेष पार्सल रेल्वेगाड्या तसेच मालगाड्यांची वाहतूक सुरुच ठेवली होती. रेल्वेत पुन्हा ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. त्यामुळे या काळातही रेल्वे प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्यावतीने ३७ विशेष पार्सल रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यात ००१०९ मुंबई-नागपूर विशेष पार्सल रेल्वेगाडी २५ एप्रिल ते ३ मे पर्यंत धावणार आहे. ००११० नागपूर-मुंबई विशेष पार्सल रेल्वेगाडी २५ एप्रिल ते ३ मे पर्यंत धावणार आहे. ००११३ मुंबई-शालिमार ही गाडी नागपूरमार्गे २५ एप्रिल ते ३ मे पर्यंत चालविण्यात येईल. ००११४ शालिमार-मुंबई विशेष पार्सल रेल्वेगाडी नागपूर मार्गे २५ एप्रिल ते ३ मे पर्यंत चालविण्यात येईल. ००४५९ चेन्नई सेंट्रल-नानगल डॅम ही विशेष पार्सल रेल्वेगाडी चेन्नई सेंट्रल येथून २० एप्रिलला सकाळी ९.४५ वाजता सुटेल. नागपुरात ही गाडी रात्री २.०५ वाजता येईल. परंतु या सर्व पार्सल रेल्वेगाड्यात एकाही प्रवाशाला प्रवास करण्याची परवानगी राहणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.