रेल्वे निघून गेली, फाटक उघडेच : नागपुरात टळली दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 10:50 PM2018-10-25T22:50:53+5:302018-10-25T22:53:15+5:30
सकाळी ११ वाजता भंडारा मार्गावरील एचबी टाऊनजवळील रेल्वे क्रॉसिंगच्या रस्त्यावर खूप गर्दी होती. दरम्यान रेल्वेगाडी आली. वाहन चालक न थांबता ये-जा करीत असल्यामुळे गेटमन प्रयत्न करूनही रेल्वेगेट बंद करू शकला नाही. रेल्वेगाडी निघून जाईपर्यंत रेल्वेगेट उघडेच होते. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सकाळी ११ वाजता भंडारा मार्गावरील एचबी टाऊनजवळील रेल्वे क्रॉसिंगच्या रस्त्यावर खूप गर्दी होती. दरम्यान रेल्वेगाडी आली. वाहन चालक न थांबता ये-जा करीत असल्यामुळे गेटमन प्रयत्न करूनही रेल्वेगेट बंद करू शकला नाही. रेल्वेगाडी निघून जाईपर्यंत रेल्वेगेट उघडेच होते. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही.
सकाळी १० ते ११ वाजता सर्वांची कार्यालयात जाण्याची वेळ असते. सर्वांना वेळेवर कार्यालयात पोहोचायचे असते. सकाळी ११ वाजता नागभीड नॅरोगेज लाईनवर रेल्वेगाडी येण्याची वेळ असते. अनेकदा नागरिक रेल्वेगेटच्या खालून निघण्याचा प्रयत्न करतात. गुरुवारी वाहतूक अधिक असल्यामुळे आणि वाहनांची ये-जा सुरू राहिल्यामुळे भंडारा रोड येथील रेल्वेगेटवर तैनात गेटमनने एकीकडील गेट बंद केले, परंतु दुसरीकडील गेट तो बंद करू शकला नाही. रुळावरील लाल झेंडीसुद्धा हटविण्यात आली नाही. लाल झेंडी पाहून लोकोपायलटने रेल्वेगाडीचा वेग कमी केला. रेल्वेगाडी गेटजवळ पोहोचली तेव्हा एका महिला कर्मचाऱ्याने धावत जाऊन रुळावरील लाल झेंडी हटविली आणि दुसºया कर्मचाºयाने रेल्वेगाडीली हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यात रेल्वेगाडी निघून जाईपर्यंत गेट बंद होऊ शकले नाही. रेल्वेगाडी गेल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
घटनेची चौकशी करू
‘गेट बंद झाल्याशिवाय रेल्वेगाडी पुढे जाऊ शकत नाही. अशी घटना घडली असेल तर ती गंभीर बाब आहे. या प्रकरणाचा तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.’
आशुतोष श्रीवास्तव, सिनिअर डीसीएम, दपूम रेल्वे, नागपूर विभाग