महामेट्रोच्या २६० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण : ट्रायल रनला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 08:45 PM2019-02-19T20:45:15+5:302019-02-19T20:46:39+5:30
महामेट्रोत नव्याने भरती झालेले २६० अधिकारी व कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या संचालनासाठी प्रशिक्षित करण्यात येत आहे. प्रशिक्षितांच्या सरावासाठी वेळोवेळी ‘मॉक ड्रील’चे आयोजन करण्यात येत असून अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे तयार आहे किंवा नाही याची खात्री महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे करण्यात येत आहे. सर्व मॉक ड्रील आणि प्रशिक्षण परीक्षेत अधिकारी खरे उतरले आहेत. मेट्रोची व्यावसायिक सेवा लवकरच सुरू होणार असून तीन दिवसीय ट्रायल रन यशस्वी ठरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोत नव्याने भरती झालेले २६० अधिकारी व कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या संचालनासाठी प्रशिक्षित करण्यात येत आहे. प्रशिक्षितांच्या सरावासाठी वेळोवेळी ‘मॉक ड्रील’चे आयोजन करण्यात येत असून अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे तयार आहे किंवा नाही याची खात्री महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे करण्यात येत आहे. सर्व मॉक ड्रील आणि प्रशिक्षण परीक्षेत अधिकारी खरे उतरले आहेत. मेट्रोची व्यावसायिक सेवा लवकरच सुरू होणार असून तीन दिवसीय ट्रायल रन यशस्वी ठरली आहे.
सेक्शन इंजिनिअर, ज्युनिअर इंजिनिअर, स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर, टेक्निशियन व एफएमएस स्टाफ यांना प्रवासी सेवेसंबंधित तथा आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे. पूर्वी डीएमआरसी (दिल्ली) येथे ऑपरेशन अॅण्ड मेंटेनन्स स्टाफला ४५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. ५० स्टेशन कंट्रोलर, ट्रेन आॅपरेटर, ३४ सेक्शन इंजिनिअर, ज्युनिअर इंजिनिअर, ३१ टेक्निशियन यांना ४५ दिवसांची बेसिक ट्रेनिंग, ७ दिवसांची फायर फायटिंग, सेफ्टी अॅण्ड फस्टएड ट्रेनिंग, ७ दिवसांचे सॉफ्ट स्कील, कम्युनिकेशन स्कील, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देण्यात आले. यासह ३० दिवसांचे ओइएम, कॉन्ट्रक्टर, सप्लायरद्वारे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. तर टॉम ऑपरेटर, सीएफए, हाऊस किपिंग, सिक्युरिटी अशा एकूण १३० एफएमएस कर्मचाऱ्यांना एकूण ४५ दिवसांचे बेसिक ट्रेनिंग, फायर फायटिंग सेफ्टी अॅण्ड फस्टएड ट्रेनिंग, सॉफ्ट स्कील, कम्युनिकेशन स्कील, पर्सनालिटी डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देण्यात आले.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक (वित्त) एस शिवमाथन, संचालक (रोलिंग स्टॉक व सिस्टीम) सुनील माथूर, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे, सीपीएम (ओ अॅण्ड एम) सुधाकर उराडे, प्रबंधक (प्रशिक्षण व एफएमएस) महेंद्र स्वामी स्टेशनवर प्रवासी सेवेसाठी लागणाऱ्या सुरक्षेसंबंधी व्यवस्था करण्यात व्यस्त आहेत. अधिकारी व कर्मचारी तणावमुक्त राहण्यासाठी ४८ तासात सायंकाळी १ तास मेडिटेशन करण्यात येते. प्रशिक्षणासह प्रात्यक्षिक परीक्षेवर लक्ष देण्यात येते. हाऊस किपिंग स्टाफ आपातकालीन परिस्थितीत योग्य कार्य करू शकेल, याची खात्री करण्यात येते. एकूणच महामेट्रोची प्रवासी सेवा सुरू होण्यापूर्वी महामेट्रोने अधिकारी व कर्मचारी संबंधित संपूर्ण तयारी केली आहे.