ट्रायकोकार्ड किटचे वितरण व निर्मितीचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:11 AM2021-07-14T04:11:37+5:302021-07-14T04:11:37+5:30
भिवापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतकरी गट व महिला ...
भिवापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतकरी गट व महिला बचत गटांना ट्रायकोग्रामा कार्डस निर्मितीबाबत प्रशिक्षण व ट्रायकोकार्ड किटचे वितरण करण्यात आले.
पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला सभापती ममता शेंडे, गटविकास अधिकारी माणिक हिमाने, सदस्य राहुल मसराम, आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन गणवीर, उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक रवींद्र शेंडे, आरती तिमांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. आत्मा व उमेद अंतर्गत स्थापित शेतकरी गट, महिला बचत गट, कृषी मित्र, कृषी सखी, प्रगतिशील शेतकरी यांना ट्रायकोकार्ड निर्मितीबाबतच्या २० किटचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी ट्रायकोग्रामा कार्डच्या वापरामुळे रासायनिक औषधांची फवारणी कमी होऊन खर्चात बचत करता येईल. शिवाय शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढ होईल, असे मत व्यक्त केले. ट्रायकोकार्ड हे भाजीपाला पिके, फळे, खोड पोखरणारी अळी, लष्करी अळी, घाटेअळी, धानावरील खोडकिडी, कापसावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करते. शेतकरी त्यांच्या शेतात वापरण्याइतपत अथवा व्यवसायिक स्वरूपात ट्रायकोकार्ड तयार करू शकतात. याबाबत सचिन गणवीर, रवींद्र शेंडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी गट व महिला बचत गटाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
130721\img-20210709-wa0179.jpg
गटविकास अधिकारी माणिक हिमाने किट वितरीत करतांना