वन्यजीव कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:48 PM2019-09-17T23:48:23+5:302019-09-17T23:50:57+5:30

वन्यजीव अपराधासंबंधीची प्रकरणे योग्यपणे हाताळली जावी आणि त्यांना शिक्षा करण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, यासाठी वनविभागातील कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेला मंगळवारी प्रारंभ झाला.

Training workshop for effective enforcement of wildlife law | वन्यजीव कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा 

वन्यजीव कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा 

Next
ठळक मुद्देपोलीस व वनकर्मचाऱ्यांचा सहभाग : विदर्भातील ५२ अधिकारी-कर्मचारी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, वर्धा व नागपूर जिल्हयातील व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य क्षेत्रात तसेच प्रादेशिक भागात घडणाऱ्या वन्यजीव अपराधासंबंधीची प्रकरणे योग्यपणे हाताळली जावी आणि त्यांना शिक्षा करण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, यासाठी वनविभागातील कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेला मंगळवारी प्रारंभ झाला.
वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो नवी मुंबई व महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने हरिसिंग वन सभागृहात कार्यशाळेचे उद्घाटन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितिन काकोडकर, व प्रादेशिक उपसंचालक (पश्चिम विभाग) नवी मुंबईचे वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो श्री. एम. मारनको यांच्या हस्ते करण्यात आले. विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, वर्धा व नागपूर जिल्हयातील वन विभागाचे आठ सहाय्यक वनसंरक्षक, २० वनपरिक्षेत्र अधिकारी, चार वनपाल असे ३२ अधिकारी व पोलीस विभागाचे दोन पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्तराचे ७ अधिकारी सहभागी आहेत. उद्घाटन सत्राला डब्ल्यू.डब्ल्यू.एफ. इंडियाचे वरीष्ठ प्रकल्प अधिकारी अजिंक्य भटकर उपस्थित होते.
नितिन काकोडकर म्हणाले, संरक्षित क्षेत्रामध्ये किंवा संरक्षित क्षेत्राभोवतालाच्या परिसरामध्ये वन्यजीव गुन्हा घडल्यावर प्रचलित वन्यजीव कायद्याच्या अधिन राहून योग्य नियोजन करा. वेळोवेळी मागोवा घ्या. वनगुन्ह्याची चौकशी करुन वेळीच प्रकरण न्यायप्रविष्ट केल्यास भविष्यातील अडचणी टाळता येतात. पोलीस व वन विभागांनी एकत्रितपणे काम केल्यास गुन्हे राखण्यास मदत होईल.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी वन्यजीव कायदा अंमलबजावणीच्या बळकटीकरणाबाबत एम. मारनको, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे माजी सल्लागार डॉ. ए. डी. खोलकुटे यांनी सादरीकरण केले. दुसऱ्या दिवशी संचालक डब्युपीएसआय (मध्य भारत) नितीन देसाई यांचे वन्यप्राण्यांच्या शिकारी या विषयावर आणि एम. मारनको यांचे वनगुन्ह्यासंबंधी अपराधाला मदत करणारे घटक या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.

Web Title: Training workshop for effective enforcement of wildlife law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.