Nagpur | रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! विकासकामांमुळे रेल्वेगाड्या रद्द, काही शॉर्ट टर्मिनेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 11:53 AM2022-06-30T11:53:33+5:302022-06-30T12:02:00+5:30
प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यानागपूर विभागात राजनांदगाव ते कळमना दरम्यान थर्ड लाइनचे काम करण्यात येत असल्यामुळे काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून काही रेल्वेगाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
३० जूनला १२७७२ रायपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच १२४०९ रायगड-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस जूनला आणि २०८४५ बिलासपूर-बिकानेर एक्स्प्रेस ३० जूनला रद्द करण्यात आली आहे. तसेच १२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस ३० जूनला नागपूर रेल्वेस्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस ३० जूनला गोंदियाऐवजी नागपूर रेल्वेस्थानकावरून सोडण्यात येणार आहे. ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ३० जूनला नागपूर रेल्वेस्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार असून ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ३० जूनला गोंदियाऐवजी नागपूर रेल्वेस्थानकावरून चालविण्यात येणार आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.