रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! दपूम रेल्वेत ‘इन्फ्रास्ट्रक्चर ब्लॉक’मुळे रेल्वेगाड्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2022 11:13 AM2022-09-01T11:13:20+5:302022-09-01T11:19:22+5:30
३ सप्टेंबरपर्यंत राजनांदगाव-कळमना थर्ड लाईनचे काम
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यानागपूर विभागात ३ सप्टेंबरपर्यंत राजनांदगाव-कळमना थर्ड लाईनचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे काचेवानी रेल्वे स्थानकावर इन्फ्रास्ट्रक्चर ब्लॉक घेण्यात आला असल्याने काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय दपूम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या निर्णयानुसार रेल्वे गाडी क्रमांक १८०२९/१८०३० शालीमार-एलटीटी-शालीमार एक्स्प्रेस ४ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. रेल्वे गाडी क्रमांक १२८०९/१२८१० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल ४ सप्टेंबरपर्यंत, १२१२९/१२१३० हावडा-पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस ४ सप्टेंबरपर्यंत, १२१०१ एलटीटी-शालीमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस २ आणि ३ सप्टेंबरला तसेच १२१०२ शालीमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस १, ४ आणि ५ सप्टेंबरला रद्द राहणार आहे. २२८४६ हटिया-पुणे एक्स्प्रेस २ सप्टेंबरला, २२८४५ पुणे-हटिया एक्स्प्रेस ४ सप्टेंबरला रद्द राहील. १२८१२ हटिया-एलटीटी एक्स्प्रेस २ आणि ३ सप्टेंबरला आणि १२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस ४ आणि ५ सप्टेंबरला रद्द करण्यात आली आहे. २२५१२ कामाख्या-एलटीटी एक्स्प्रेस ३ सप्टेंबर, २२५११ एलटीटी-कामाख्या एक्स्प्रेस ६ सप्टेंबर, २०८२२ सांतरागाछी-पुणे एक्स्प्रेस ३ सप्टेंबर, २०८२१ पुणे-सांतरागाछी एक्स्प्रेस ५ सप्टेंबरला रद्द राहील. १२८४९ बिलासपूर-पुणे एक्स्प्रेस १ सप्टेंबरला आणि १२८५० पुणे-बिलासपूर एक्स्प्रेस २ सप्टेंबरला रद्द करण्यात आली आहे. १२१४५ एलटीटी-पुरी एक्स्प्रेस ४ सप्टेंबरला आणि १२१४६ पुरी-एलटीटी एक्स्प्रेस ६ सप्टेंबरला रद्द राहील.
विदर्भ, महाराष्ट्र नागपुरातून सुटणार
इन्फ्रास्ट्रक्चर ब्लॉकमुळे १२१०५/१२१०६ गोंदिया-मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस ५ सप्टेंबरपर्यंत नागपुरातून सुटणार आणि समाप्त होणार आहे. तसेच ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ४ सप्टेंबरपर्यंत नागपुरात समाप्त होऊन १ ते ६ सप्टेंबरदरम्यान नागपूरवरून सुटणार आहे.