रेल्वेगाड्या १६ तास विलंबाने
By admin | Published: December 26, 2014 12:49 AM2014-12-26T00:49:44+5:302014-12-26T00:49:44+5:30
दाट धुके पडल्यामुळे दिल्ली आणि इतर मार्गावरील रेल्वे वाहतूक गुरुवारीही विस्कळीत होती. नागपूर रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या ११ रेल्वेगाड्यांना ४ ते १६ तासांचा विलंब झाल्यामुळे
धुक्यामुळे ‘लेट’ : प्रवाशांची होतेय गैरसोय
नागपूर : दाट धुके पडल्यामुळे दिल्ली आणि इतर मार्गावरील रेल्वे वाहतूक गुरुवारीही विस्कळीत होती. नागपूर रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या ११ रेल्वेगाड्यांना ४ ते १६ तासांचा विलंब झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
नवी दिल्ली आणि इतर मार्गावरील वाहतूक मागील पाच दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. दाट धुके पडत असल्यामुळे रेल्वेगाडी चालविणाऱ्या लोकोपायलटला समोरील सिग्नल दिसत नाही. त्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्या मंद गतीने चालविण्यात येत आहेत. यामुळे अनेक रेल्वेगाड्यांना ४ ते १६ तासांचा विलंब झाला. दरम्यान उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यात १८२३८ अमृतसर बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस १५ तास, १२४१० हजरत निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस ११ तास, १२७२४ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस १६ तास, १६०३२ जम्मुतावी-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस ११ तास, १२६१५ चेन्नई-नवी दिल्ली जीटी एक्स्प्रेस ८ तास, १२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस १३ तास, १२६२१ चेन्नई-नवी दिल्ली तामिळनाडू एक्स्प्रेस ४ तास, १२६२२ नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस ९ तास, १२७२२ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस ६.३० तास, १२२९६ पटना-बंगळुरू संघमित्रा एक्स्प्रेस ८ तास आणि १२६७० छापरा-चेन्नई गंगाकावेरी एक्स्प्रेस ३.३० उशिराने धावत आहे. \दरम्यान उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना रेल्वेस्थानकावर ताटकळत बसण्याची पाळी आली आहे. यामुळे रेल्वेस्थानकावरील वेटींग रुम फुल्ल झाल्या आहेत. (प्रतिनिधी)