अल्ट्राव्हायोलेट किरणांद्वारे होणार रेल्वेगाड्यांची सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 10:18 AM2021-02-24T10:18:39+5:302021-02-24T10:19:53+5:30

Nagpur News नागपूर मंडळाने तयार केलेला रोबोट ‘उस्ताद’ आता यार्डमध्ये येणाऱ्या गाड्यांचे डबे अल्ट्राव्हायोलेट किरणांद्वारे स्वच्छ करेल.

Trains will be cleaned by ultraviolet rays | अल्ट्राव्हायोलेट किरणांद्वारे होणार रेल्वेगाड्यांची सफाई

अल्ट्राव्हायोलेट किरणांद्वारे होणार रेल्वेगाड्यांची सफाई

Next
ठळक मुद्दे नागपूर मंडळाचा रोबोट ‘उस्ताद’श्रमिक स्पेशल गाड्यांमध्ये पार पडली ट्रायल रोबोटचा दुसरा वर्जन पढच्या आठवड्यात होईल तयार

वसीम कुरैशी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या वाढत्या दुष्प्रभावादरम्यान मध्य रेल्वे मंडळाने रेल्वेगाड्यांना संक्रमणापासून वाचविण्याचा उपाय शोधला आहे. नागपूर मंडळाने तयार केलेला रोबोट ‘उस्ताद’ आता यार्डमध्ये येणाऱ्या गाड्यांचे डबे अल्ट्राव्हायोलेट किरणांद्वारे स्वच्छ करेल. उस्ताद-१च्या माध्यमातून ही ट्रायल श्रमिक स्पेशल गाड्यांमध्ये आधीच घेण्यात आली आहे. आता लवकरच या रोबोटचा अपडेटेड वर्जन आणला जात आहे. हा रोबोट एकवेळ गाडीत ठेवल्यावर सर्वच्या सर्व डबे पॅराबैंगणी किरणांनी स्वच्छ करेल.

मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या यांत्रिक अभियांत्रिकी शाखेने ट्रेनच्या खाल्या भागाचे (अंडरगियर) निरीक्षण करण्यासाठी २०१९ मध्ये हा रोबोट तयार केला होता. रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वेट्रॅकमध्ये साचलेल्या घाणीपासून वाचविण्यासाठी व उत्तम प्रकारे तपासणी करण्याच्या हेतूने हा रोबोट तयार करण्यात आला होता. परंतु, ट्रॅकमध्ये असलेल्या गीट्टी व बॅलास्टमधून पुढे जाणे रोबोटसाठी कठीण जात होते. त्यानंतर आणखीन अपटेडेड रोबोट बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता या रोबोटचा नवा वर्जन गीट्टी व दगडांच्या बाधा पार करत पुढे जातो. हा रोबोट ट्रेनच्या खाली लागलेल्या उपकरणांची ओळख आकाराद्वारे करेल आणि कुठे क्रॅक गेला असेल किंवा बोल्टमध्ये सैलता आली असेल तर तेही सांगेल. उस्ताद-२ला मोबाईलद्वारे ऑपरेट करता येणार आहे आणि त्याचे फुटेज एकसाथ अनेक अधिकारी बघू शकणार आहेत. विकसित वर्जनचा नवा रोबोट ट्रेनच्या दोन डब्यांमधली फाल्ट प्लेट सहजतेने पार करू शकणार आहे. यापूर्वीचा रोबोट एका डब्यातून दुसऱ्या डब्यात उचलून न्यावा लागत होता.

‘उस्ताद’चे वैशिष्ट्य

- रेल्वे बोर्डाचे अप्रुव्हल मिळाले आहे.

- प्रत्येक झोनल रेल्वेच्या कोचिंग डेपोत हा रोबोट असेल.

- उस्ताद-२मध्ये ६ व्हील्स आणि उत्तम एलईडी लाईट असतील.

- आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्वीपेक्षा अधिक उत्तम होईल.

- याच्या तपासणीनंतर रेल्वे कर्मचारी सुधार कार्य लवकर व सहजतेने करू शकतील.

अपडेटेड रोबोची रेंज वाढवली

मध्य रेल्वे मंडळ व्यवस्थापक ऋचा खरे यांच्या मार्गदर्शनात हे कार्य झाले आहे. रोबोटच्या नव्या वर्जनची रेंज वाढविण्यात आली आहे. यात उच्चतम पॉवर देणारी बॅटरी लावण्यात आली असून, हा रोबोट आयओटी बेस्ड आहे. याद्वारे सुधार कार्यावर नजर ठेवता येईल. ट्रेनचे सर्व डबे बंद करून हा रोबोट अल्ट्राव्हायोलेट किरणांनी स्वच्छता करेल.

- अखिलेश चौबे, प्रवर मंडळ यांत्रिक अभियंता, मध्य रेल्वे मंडळ

..

Web Title: Trains will be cleaned by ultraviolet rays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.