तृतीयपंथीयातील वाद विकोपाला : चमचमवर सेनापती उत्तमबाबाचा प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 09:36 PM2019-06-04T21:36:39+5:302019-06-04T22:02:55+5:30

नेतृत्वाच्या मुद्यावरून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तृतीयपंथीयांच्या दोन गटातील वादाला मंगळवारी हिंसक वळण मिळाले. सेनापती म्हणून ओळखला जाणाऱ्या तृतीयपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील तृतीयपंथी चमचमवर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात चमचम गंभीर जखमी झाली. कळमन्यातील कामनानगरात मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

Trans gender internal dispute turned violent: Senapati Uttam Baba deadly attacked on Chamcham | तृतीयपंथीयातील वाद विकोपाला : चमचमवर सेनापती उत्तमबाबाचा प्राणघातक हल्ला

गंभीर जखमी चमचम

Next
ठळक मुद्देनागपुरातील कळमना भागात प्रचंड तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नेतृत्वाच्या मुद्यावरून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तृतीयपंथीयांच्या दोन गटातील वादाला मंगळवारी हिंसक वळण मिळाले. सेनापती म्हणून ओळखला जाणाऱ्या तृतीयपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील तृतीयपंथी चमचमवर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात चमचम गंभीर जखमी झाली. कळमन्यातील कामनानगरात मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. 


नागपूर-विदर्भाच्या तृतीयपंथीयांच्या गटाची गादी उत्तमबाबा काही वर्षांपासून सांभाळतो आहे. त्याच्या नेतृत्वाला तृतीयपंथीयांच्याच दुसऱ्या एका गटाचा तीव्र विरोध आहे. या विरोधामुळे उत्तर नागपुरात दोन्ही गटांकडून परस्परांवर हल्ले, एकमेकांना धमक्या देणे आदी प्रकार घडले आहेत. दोन वर्षांपूर्वी उत्तमबाबाने विरोधी गटातील तृतीयपंथीयांवर फायरिंगही केले होते. तर, विरोधी गटाने वर्षभरापूर्वी जोरदार हल्ला चढवून त्याला मारहाणही केली होती.  

पाचपावली, लकडगंज, वर्धमाननगर, जरीपटका, तहसील आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन्ही गटांनी परस्परांविरोधात अनेक तक्रारी नोंदविल्या आहेत. त्यांच्यातील हाणामाऱ्या आता नेहमीचाच प्रकार झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून या दोन गटातील धुसफूस पुन्हा तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी दुपारी अडीच वाजता उत्तमबाबाने त्याच्या साथीदारांसह कळमन्यातील कामनानगरात राहणाºया चमचम गजभियेच्या घरी जाऊन चमचमवर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात चमचम गंभीर जखमी झाले. दरम्यान, बाजूची मंडळी धावली आणि त्यांनी उत्तमबाबा तसेच साथीदाराला आवरले. गंभीर जखमी झालेल्या चमचमला रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती कळताच कळमना परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. शहरातील तृतीयपंथीयांनी मोठ्या संख्येत रुग्णालय आणि कळमना ठाण्यात धाव घेतली. ठाण्यासमोर त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. 

 

पोलिसांनी धावपळ करून उत्तमबाबाला ताब्यात घेतले.

Web Title: Trans gender internal dispute turned violent: Senapati Uttam Baba deadly attacked on Chamcham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.