गुन्हे शाखेतील आठ पाेलिसांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:09 AM2021-05-20T04:09:44+5:302021-05-20T04:09:44+5:30
शुभम शेंडेवर एमपीडीए नागपूर : नंदनवन झाेपडपट्टीतील गुंड शुभम ऊर्फ शाहरूख शेंडला एमपीडीए अंतर्गत कारागृहात रवानगी करण्यात आली. शुभमच्या ...
शुभम शेंडेवर एमपीडीए
नागपूर : नंदनवन झाेपडपट्टीतील गुंड शुभम ऊर्फ शाहरूख शेंडला एमपीडीए अंतर्गत कारागृहात रवानगी करण्यात आली. शुभमच्या विराेधात विनयभंग, हल्ला करणे, मारझाेड, धमकी देणे, आदींचे प्रकरण दाखल आहेत. त्यामुळे नंदनवन पाेलीस ठाण्याअंतर्गत त्याची दहशत हाेती. पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाई करीत त्याला कारागृहात धाडले.
विद्युत खांबावर वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू
नागपूर : विद्युत विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्याचे विजेच्या धक्का लागल्याने निधन झाले. अभय दिवाकर निकाेडे (वय २४, रा चिमुर, चंद्रपूर) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी रात्री हिंगणाअंतर्गत कान्हाेलीबारा येथे पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला हाेता. दुरुस्तीचे काम करण्यासाठी ते खांबावर चढले हाेते. काम करताना वीज तारेचा जाेरदार झटका लागला. लाईनमन देविदास उईके यांनी नागरिकांच्या मदतीने त्यांना खाली उतरविले आणि रुग्णालयात दाखल केले. त्यांना मृत घाेषित करण्यात आले. हिंगणा पाेलिसांनी आकस्मिक मृत्युची नाेंद केली आहे.