मुंढे जाताच बदल्यांची प्रक्रिया ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 11:19 PM2020-09-02T23:19:12+5:302020-09-02T23:29:01+5:30

तुकाराम मुंढे आयुक्त असताना मनपाच्या विविध विभागात अनेक वर्षापासून ठाण मांडून असलेले अधिकारी-कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात बदली करण्याचा त्यांचा मानस होता. कनिष्ठ अभियंता, अभियांत्रिकी सहाय्यकाच्या बदल्या करून त्यांनी याला सुरुवात केली होती. बदल्यांसाठी विभागवार याद्या तयार करण्यात आल्या. परंतु मुंढे यांची बदली होताच बदल्यांची प्रक्रिया थंड बस्त्यात पडली आहे.

Transfer process stalled as soon as Mundhe goes! | मुंढे जाताच बदल्यांची प्रक्रिया ठप्प!

मुंढे जाताच बदल्यांची प्रक्रिया ठप्प!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुकाराम मुंढे आयुक्त असताना मनपाच्या विविध विभागात अनेक वर्षापासून ठाण मांडून असलेले अधिकारी-कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात बदली करण्याचा त्यांचा मानस होता. कनिष्ठ अभियंता, अभियांत्रिकी सहाय्यकाच्या बदल्या करून त्यांनी याला सुरुवात केली होती. बदल्यांसाठी विभागवार याद्या तयार करण्यात आल्या. परंतु मुंढे यांची बदली होताच बदल्यांची प्रक्रिया थंड बस्त्यात पडली आहे.
मनपा मुख्यालय व झोन कार्यालयात मागील पंधरा ते वीस वर्षापासून एकाच विभागात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी तयार करून मोठ्या संख्येने बदल्या केल्या जाणार होत्या. परंतु मुंढे जाताच बदल्यांना स्थगिती देण्यासाठी मनपातील पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील अधिकारी व कर्मचारी कामाला लागले आहेत.
प्रत्येक विभागात महत्वाच्या टेबलवर पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील अधिकारी व कर्मचारी असल्याने फाईल मंजूर करणे सोपे जाते. याचा विचार करता या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ नये, यासाठी काही पदाधिकारी कामाला लागले आहेत.

काम एकीकडे वेतन दुसरीकडे
वित्त विभागामध्ये ज्येष्ठ श्रेणी लिपिक या पदावर मनपातील राजस्व निरीक्षक या पदावर काम करीत आहे. तसेच काही अधिकारी कर्मचारी मर्जीतील विभागात काम करीत असून वेतन मात्र दुसऱ्या विभागातून घेतात. मुंढे गेल्यामुळे बदल्यांना स्थगिती देण्यात आल्याची मनपात चर्चा आहे.

नगररचना व वित्त विभागात मर्जीतील कर्मचारी
महापालिकेच्या वित्त व लेखा विभाग तसेच नगररचना विभागात मनपातील काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचारी अधिकारी मागील अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांना धक्का लागू नये यासाठी पदाधिकारी कामाला लागल्याची चर्चा आहे.

Web Title: Transfer process stalled as soon as Mundhe goes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.