जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या : अधिसूचना जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:48 AM2019-04-06T00:48:56+5:302019-04-06T00:50:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यभरातील जिल्हा न्यायाधीश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश व कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश यांच्या वार्षिक बदल्यांची अधिसूचना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यभरातील जिल्हा न्यायाधीश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश व कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश यांच्या वार्षिक बदल्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेकडे न्यायाधीश व वकिलांचे लक्ष लागले होते.
नागपूर येथील व्ही.आर. जोशी यांची अमळनेर (जळगाव), व्ही. के. यावलकर यांची पुणे, टी.जी. मिटकरी यांची औरंगाबाद, व्ही.जी. रघुवंशी यांची जालना तर, ए. के. शर्मा यांची अकोला येथील जिल्हा व सत्र न्यायालयातबदली करण्यात आली. पी.के. अग्निहोत्री यांची बुलडाणा कुटुंब न्यायालय, ए.सी. राऊत यांची औद्योगिक न्यायालय भंडारा तर, पुरुषोत्तम जाधव यांची मुंबई शहर दिवाणी न्यायालयात बदली झाली. वसंत कुलकर्णी व एस.के. देशपांडे यांना नागपूर येथे कायम ठेवण्यात आले.
राजाराम पांडे (भंडारा) यांची विधी व न्याय विभाग नागपूरचे सहसचिवपदी, नांदेड येथील एस. एस. तोडकर यांची नागपूर कुटुंब न्यायालयात, जालना येथील एस. एस. कंठाळे यांची नागपूर औद्योगिक न्यायालयात तर, पुणे येथील एस. के. कऱ्हाळे, गंगाखेड (परभणी) येथील ए.डी. हरणे, अमरावती येथील व्ही. डी. इंगळे, माळशिरास (सोलापूर) येथील आर.आर. पटारे, सोलापूर येथील सुनील पाटील व पंढरपूर (सोलापूर) येथील आर. के. शेख यांची नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात बदली करण्यात आली.
वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या
न्यायाधीश बदली
एस. आर. तिवारी (अकोला) नागपूर
आर. एस. सालगावकर (नागपूर) मुंबई
एस. जी. शेख (नागपूर) मुंबई
के. आर. देशपांडे (नागपूर) पुणे
टी. एम. अहमद (नागपूर) ठाणे
एस. व्ही. दिंडोकर (नागपूर) पुणे
एन. पी. पवार (उस्मानाबाद) नागपूर
डी. जी. मालविया (जळगाव) नागपूर
ओ. एन. मंत्री (नागपूर) पुणे
पी. एल. गुप्ता (अमरावती) नागपूर
बी. एम. कार्लेकर (नागपूर) कायम
एस. आर. तोतला (नागपूर) कायम
व्ही. पी. फडणीस (पुणे) नागपूर
ए. एल. सराफ (चंद्रपूर) नागपूर
कनिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या
नागपूर येथील पंकज नायगावकर यांची देसाईगंज (गडचिरोली), एन.एन. बेदरकर यांची अमरावती, एन.बी. जाधव यांची दौंड (पुणे), एम.टी. खराडे यांची कोल्हापूर, विनोद पाटील यांची अंजनगाव (अमरावती), यू. एम. वैद्य यांची फलटण (सातारा), जी.एम. नदाफ यांची माळसिरास (सोलापूर), बी. डी. तारे यांची औरंगाबाद, शीतल कौल यांची ठाणे, आर. बी. सोरेकर यांची नायगाव बाजार (नांदेड), जी.सी. फुलझलके यांची नांदेड तर, एम.आर. वाशीमकर यांची चंद्रपूर येथे बदली करण्यात आली. एम.डी. जोशी, शहजाद मुनाफ व जे.डी. जाधव यांना नागपूरमध्ये कायम ठेवण्यात आले. कळमेश्वर येथील व्ही.बी. कांबळे यांची बारामती (पुणे), कामठी येथील ए.डी. तिडके यांची पुणे, रामटेक येथील एम.एस. बनचारे यांची यावल (जळगाव), कुही येथील डी.बी. गुट्टे यांची गंगाखेड (परभणी), सावनेर येथील व्ही.व्ही. जोशी यांची पालम (परभणी), कामठी येथील एस.ए. पाटील यांची पुणे, पारशिवनी येथील एस.डी. वानखडे यांची कोकण तर, मौदा येथील आर.पी. बाठे यांची जळगाव येथे बदली झाली.
खामगाव (बुलडाणा) येथील व्ही.व्ही. सावरकर यांची कळमेश्वर, अमरावती येथील डी.आर. भोला यांची कामठी, यावल (जळगाव) येथील व्ही. पी. धुर्वे यांची रामटेक, हिंगोली (परभणी) येथील एच.एन. पोळे यांची सावनेर, बारामती (पुणे) येथील एस. बी. गाडवे यांची कामठी, पंढरपूर (सोलापूर) येथील डी. यू. राजपूत यांची कुही, गेवराई (बीड) येथील एन. आर. भालगट यांची पारशिवनी तर, वाशीम येथील एस.पी. वानखडे यांची मौदा येथे बदली करण्यात आली. पुसद (यवतमाळ) येथील वसीम देशमुख, ठाणे येथील पी. डी. चव्हाण, ए. एम. चव्हाण, पुणे येथील प्रतिनीता पाटील, पेण (रायगड) येथील एस. डी. मेहता, अहमदपूर (लातूर) येथील व्ही. एस. मोरे, मोर्शी (अमरावती) येथील व्ही.एस. पाटील, परळी वैजनाथ (बिड) येथील व्ही. एम. बनसोड व लातूर येथील एम.टी. ठावरे यांची नागपूर येथे बदली झाली.