नागपूर जिल्हा परिषदेतील १५८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; पारदर्शी पद्धतीने पार पडली प्रक्रिया 

By गणेश हुड | Published: May 12, 2023 07:01 PM2023-05-12T19:01:14+5:302023-05-12T19:03:10+5:30

Nagpur News नागपूर जिल्हा परिषदेत ९ ते १२ मे दरम्यान  आबासाहेब खेडकर सभागृहात पार पडलेल्या  जिल्हास्तरीय बदल्यांच्या  प्रक्रियेत  सर्व विभागातील  १५८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. 

Transfers of 158 employees in Nagpur Zilla Parishad; The process was carried out in a transparent manner | नागपूर जिल्हा परिषदेतील १५८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; पारदर्शी पद्धतीने पार पडली प्रक्रिया 

नागपूर जिल्हा परिषदेतील १५८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; पारदर्शी पद्धतीने पार पडली प्रक्रिया 

googlenewsNext

गणेश हूड                                                                                         

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेत ९ ते १२ मे दरम्यान  आबासाहेब खेडकर सभागृहात पार पडलेल्या  जिल्हास्तरीय बदल्यांच्या  प्रक्रियेत  सर्व विभागातील  १५८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. 
विभागनिहाय करण्यात आलेल्या बदल्यात आरोग्य विभागातील  ४१ कर्मचारी, शिक्षण  १५, सामान्य प्रशासन विभाग  ४०, वित्त  ३, लघुपाटबंधारे २, ग्रामीण पाणी पुरवठा २, बांधकाम  ६, पशसंवर्धन  ८, महिला व बाल कल्याण  ६, कृषि  २, तर  पंचायत विभागातील ३३ अशा एकूण १५८ विनंती व प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.


गेल्या मंगळवारी बदल्यांची प्रक्रीया सुरू झाली. तीन दिवसात १२३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशाने करण्यात आल्या. 
 पहिल्या दिवशी मंगळचारी  आरोग्य व शिक्षण विभागातील ५६  कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी बुधवारी ग्रामीण पाणीपुरवठा,पशुसंवर्धन  महिला आणि बालकल्याण व कृषी विभागातील २७ कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या करण्यात आल्या. गुरुवारी सामान्य प्रशासन विभागातील ५६ कर्मचाऱ्यांच्या तर शुक्रवारी पंचायत विभागातील ३३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. 
  शासन निर्देशानुसार जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष  कुंदा राऊत यांच्या उपस्थितीत  मुख्य कार्यकारी अधिकारी  सौम्या  शर्मा,  तसेच सामान्य प्रशासन  विभागाचे विभाग प्रमुख विपुल जाधव यांनी ही प्रक्रीया पार पडली. कर्मचाऱ्यांतील आपसातील काही आक्षेप वगळता ही प्रक्रीया शांततेत पार पडली.

Web Title: Transfers of 158 employees in Nagpur Zilla Parishad; The process was carried out in a transparent manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.