नागपुरातील सार्वजनिक बांधकाम विभागात बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 01:21 AM2020-08-09T01:21:03+5:302020-08-09T01:22:38+5:30
कोविड-१९ च्या संकटादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री एकूण ७० अभियंत्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. नागपूरचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात बदली करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ च्या संकटादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री एकूण ७० अभियंत्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. नागपूरचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर सं.द. दशपुते यांना नागपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दशपुते हे आतापर्यंत पोलीस गृह निर्माणाची जबाबदारी सांभाळत होते.
या राज्यस्तरीय बदल्यांतर्गत ५ मुख्य अभियंता, १५ अधीक्षक अभियंता आणि ५० कार्यकारी अभियंत्यांची बदली करण्यात आली आहे. नागपूर मेडिकल कॉलेजच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या इंटिग्रेटेड युनिटची जबाबदारी अलका पाटणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. इतर कार्यकारी अभियंत्यांमध्ये मिलिंद बांधवकर यांना विशेष प्रकल्प, दिलीप देवरे डिव्हिजन क्रमांक ३, सतीश अंभोरे यांना विश्व बँकेचे प्रकल्प कार्यकारी अभियंता नियुक्त करण्यात आले आहे.